माजी सैनिकांचा पदके जाळण्याचा प्रयत्न

By admin | Published: November 12, 2015 12:10 AM2015-11-12T00:10:34+5:302015-11-12T00:10:34+5:30

केंद्र सरकारने घोषित केलेल्या ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेला विरोध करीत आज माजी सैनिकांनी पदके जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या वादाला आज नवीनच वळण मिळाले.

Efforts to burn ex-servicemen | माजी सैनिकांचा पदके जाळण्याचा प्रयत्न

माजी सैनिकांचा पदके जाळण्याचा प्रयत्न

Next

नवी दिल्ली : केंद्र सरकारने घोषित केलेल्या ‘वन रँक, वन पेन्शन’ योजनेला विरोध करीत आज माजी सैनिकांनी पदके जाळण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या वादाला आज नवीनच वळण मिळाले.
सरकारविरोधी घोषणा देत या माजी सैनिकांनी कॅमेऱ्यासमोर आपली पदके जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदके जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या या माजी सैनिकांना मेजर जनरल (निवृत्त) सतबीरसिंह यांच्यासह अन्य सैनिकांनी रोखले आणि पदके जाळू दिली नाहीत.
हे माजी सैनिक पदके जाळणार नाहीत, असे सांगण्यात आले होते. तथापि, ते पदके जाळणार असल्याची माहिती प्रसारमाध्यमांना मिळाली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी तेथे पोहोचले होते. त्यानंतर जवळपास ५० माजी सैनिकांनी राष्ट्रपती भवनाच्या दिशेने मार्च काढला; पण दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखून धरले. हरियाणा आणि पंजाबातील काही माजी सैनिकांनी मंगळवारी पदके वापस केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीत पदके जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेवर संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी दु:ख व्यक्त केले.
दरम्यान, आंदोलनकारी माजी सैनिकांना शांत करण्याचे प्रयत्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. सैनिकांसोबत दिवाळी साजरी करताना ते म्हणाले की, ओआरओपीशी निगडित सर्व मुद्दे न्यायालयीन समिताच्या समोर उपस्थित करून त्यावर विचार केला जाऊ शकतो.
(लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Efforts to burn ex-servicemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.