नवी दिल्ली : अदाणी, टाटा आणि एस्सार यासारख्या खाजगी वीज उत्पादक कंपन्यांना गुजरात सरकारने कोळशा दरवाढीत दिलासा दिल्यामुळे महाराष्ट्रासह पाच राज्यांतील वीज महागणार आहे.कोळसा महागल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थतीचा अभ्यास करण्यासाठी गुजरात सरकारने तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने वीज खरेदी करारात (पीपीए) सुधारणा करणे आणि कर्जदात्यांना फरक (हेअरकट) देण्याची शिफारस केली होती. त्यानुसार गुजरात सरकारने गेल्या आठवड्यात अदाणी, टाटा आणि एस्सार समूहाच्या औष्णिक वीज केंद्रांना दिलासा दिला आहे. कोळशाचा वाढता खर्च वीज वितरण कंपन्यांकडून वसूल करण्याची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. अंतिमत: ही वसुली वीज ग्राहकांकडून होणार आहे.महाराष्ट्रासह पाचही राज्य केंद्रीय आयोगाकडे भाववाढीस होकार देतील, त्यानंतरच केंद्रीय आयोग त्यासंबंधी निर्णय देऊ शकेल. अशी प्रतिक्रिया वीज क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली आहे.
गुजरात सरकारच्या निर्णयामुळे पाच राज्यांत वीज होणार महाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2018 6:23 AM