80 टक्के बलात्कार हे महिलांच्या सहमतीनं होतात, मुख्यमंत्र्यांचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 07:38 PM2018-11-17T19:38:36+5:302018-11-17T19:40:14+5:30
मुख्यमंत्र्यांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांवर वादग्रस्त विधान केलं आहे.
चंदीगड- हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी बलात्काराच्या वाढत्या घटनांवर वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी बलात्काराच्या प्रकरणात मुली आणि महिलांना दोष दिला आहे. खट्टर म्हणाले, बलात्कार आणि छेडछाडीचे 80 टक्के प्रकार हे महिलांच्या सहमतीनं होत असतात. तसेच हरियाणात बलात्कारच्या घटनांत वाढ झालेली नाही.
आधीही बलात्कार होत होते आणि आताही बलात्कार होतायत, पण हा एक चिंतेचा विषय आहे. एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं आहे. बलात्कार आणि छेडछाड प्रकरणात 80 ते 90 टक्के लोक हे एकमेकांच्या परिचयाचे असतात. बऱ्याच बलात्काराच्या प्रकरणांमध्ये पीडित आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे असतात.
एकमेकांबरोबर आधीही फिरून मोकळे झालेले असतात. त्यानंतर काही वाद होतात आणि एफआयआर दाखल करण्यात येतं, असंही मनोहर लाल खट्टर म्हणाले आहेत. मनोहर लाल खट्टर यांनी महिलांच्या स्वातंत्र्याच्या विषयावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.