इमर्जन्सीमध्ये तुम्हाला 'इथून' मिळेल कर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2016 02:16 PM2016-05-24T14:16:10+5:302016-05-24T15:51:05+5:30
माणसाच्या आयुष्यात पैसा महत्वाचा असून पैशाची कधी, कशी गरज लागेल ते सांगता येत नाही. इमर्जन्सी कधी सांगून येत नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - माणसाच्या आयुष्यात पैसा महत्वाचा असून पैशाची कधी, कशी गरज लागेल ते सांगता येत नाही. इमर्जन्सी सांगून येत नाही. अशा आणीबाणीच्या प्रसंगात पैसा उभा करणे एक मोठे आव्हान असते.
असा प्रसंग आयुष्यात आला तर, आपण मित्रांकडे, जवळचे नातेवाईक किंवा शेजा-यांकडे मदत मागतो. पण तिथून मदत मिळाली नाही मग, अशावेळी काय कराल ?
आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक सुविधा देणा-या अॅपने आता कर्ज मिळवण्याचाही एक स्त्रोत उपलब्ध करुन दिला आहे. अँडरॉईड फोनमधील 'कॅश इ' अॅपकडून तुम्हाला इमर्जन्सीच्या प्रसंगात कर्ज मिळू शकते आणि ते ही फक्त १.५ टक्के व्याजदराने.
कॅश ई बद्दल ही माहिती जाणून घ्या
१) कॅश ई कर्ज सुविधा मर्यादीत आहे. फक्त नोकरदार भारतीयांना कॅश ई चे कर्ज मिळते. स्वयंरोजगार किंवा छोटया व्यावसायिकांना कर्ज मिळत नाही.
२) तुम्हाला तुमच्या वेतनाच्या ४० टक्के रक्कम कर्ज म्हणून पंधरा दिवसांसाठी मिळते.
३) तुम्ही जे कर्ज घेतले आहे त्यावर फक्त १.५ टक्के व्याज आकारले जाते.
४) कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी, फोन क्रमांक द्यावा लागतो तसेच पॅन कार्डची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागते.
५) रहिवासी पत्ता, पे स्लीप आणि बँक स्टेटमेंटची ताजी कॉपीही अपलोड करावी लागते.
६) पहिल्यांदा कर्ज घेणा-यांना कर्जाच्या रक्कमेनुसार ४५०, ७०० आणि १२५० रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागते.