कॉम्प्युटर, प्रिंटर बनविणारी ‘एचपी’ कंपनी करणार कर्मचारी कपात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2019 05:15 AM2019-10-09T05:15:58+5:302019-10-09T05:20:01+5:30
एचपी कंपनीने गेल्याच आठवड्यात आम्ही येत्या वर्षभरात जगभरातील ७ ते ९ हजार कर्मचारी कमी करण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले होते.
नवी दिल्ली : देशात कॉम्प्युटर्स व प्रिंटर बनविणाऱ्या एचपी या अग्रगण्य कंपनीच्या भारतातील सुमारे ५५ कर्मचाऱ्यांवर लवकरच बेकारीची कुºहाड कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या कंपनीने जगभरातील तब्बल ९ हजार कंपन्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
एचपी कंपनीने गेल्याच आठवड्यात आम्ही येत्या वर्षभरात जगभरातील ७ ते ९ हजार कर्मचारी कमी करण्याचा विचार करीत असल्याचे सांगितले होते. उत्पादन खर्च कमी व्हावा आणि नफा वाढवावा, यासाठी आम्ही पुनर्रचना करणार असून, त्याचा भाग म्हणूनच आम्हाला कर्मचारी कपात करावी लागणार असल्याचे कंपनीने म्हटले होते. या कंपनीत जगभरात मिळून ५५ हजार लोक काम करीत आहेत.
या कंपनीने कॉम्प्युटर्स व प्रिंटर्सच्या काही मॉडेल्सचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही वर्षांत कॉम्प्युटर्सच्या मागणीत सातत्याने घट होत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. उत्पादनात कपात करणे म्हणजे कर्मचाºयांना कमी करणे, हे स्पष्ट आहे. वास्तविक, कंपनीच्या दृष्टीने भारत ही तिच्यासाठी मोठी बाजारपेठ आहे. तरीही कंपनीला काही कर्मचारी कमी करावेच लागणार आहे. अन्य देशांच्या तुलनेत भारतात कमी केल्या जाणाºया कर्मचाºयांची संख्या कमीच आहे.
व्यवस्थापनात मोठे बदल
गेल्या महिन्यात कंपनीच्या व्यवस्थापनात काही बदल करण्यात आले. त्याच वेळी एचपी कंपनी काही मोठे बदल करीत असल्याचा अंदाज आला होता. त्या बदलानंतर कर्मचाºयांची कपात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. भारतातील किती कर्मचाºयांना काढून टाकणार, याची माहिती एचपीने अद्याप दिलेली नाही. आम्ही जगभरातील आमच्या कर्मचाºयांना कमी करणार आहोत. त्यात भारतीय कर्मचारीही असतील, असेच कंपनीने म्हटले आहे.