विकास झाडे, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली :दिल्लीत गेल्या तीन वर्षांप्रमाणे या वर्षीही दिवाळीच्या दिवशी फटाक्यांच्या विक्री, साठवण आणि वापरावर बंदी असेल. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे याची घोषणा केली. दिल्लीतील प्रदूषणाची परिस्थिती पाहता, त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
केजरीवाल यांनी ट्विट केले की, गेल्या वर्षीप्रमाणे दिवाळीच्या वेळी दिल्लीच्या प्रदूषणाची धोकादायक परिस्थिती पाहता, सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली जात आहे, व्यापाऱ्यांना दुसऱ्या ट्विटमध्ये आवाहन केले आहे की, गेल्या वर्षी व्यापाऱ्यांनी फटाके साठविल्यानंतर प्रदूषणाचे गांभीर्य पाहता, संपूर्ण बंदी उशिरा लावली, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. यावेळी साठवणूक करू नका.