उत्तर प्रदेशात पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे डबे घसरले, 23 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2017 06:21 PM2017-08-19T18:21:36+5:302017-08-19T21:49:15+5:30
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 10 डबे रुळावरुन घसरले आहेत.
लखनौ, दि. 19 - उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 10 डबे रुळावरुन घसरले आहेत. य़ा अपघातात 23 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. ही एक्स्प्रेस हरिद्वारच्या दिशेनं जात होती. शनिवारी संध्याकाळी 5 वाजून 46 मिनिटांनी ही दुर्घटना घडली आहे. हरिद्वारहून पुरीकडे जाणारी कलिंग उत्कल एक्स्प्रेसचा भीषण असा अपघात झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात 50 हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान स्थानिक रहिवासी दुर्घटनाग्रस्त प्रवाशांच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
दुर्घटनेची छायाचित्रं पाहून हा अपघात खूपच भीषण असल्याचे दिसत आहे. अपघातादरम्यान एक्स्प्रेसचे डबे एकमेकांवर चढले आहेत. तर रुळालगत असलेल्या एका घरातही एक्स्प्रेसचा डबा घुसल्याची माहिती समोर आली आहे. मुजफ्फरनगर आणि मिरतहून मदत आणि बचाव पथक घटनास्थळाकडे रवाना करण्यात आले आहे. ही ट्रेन शनिवारी रात्री 9 वाजेदरम्यान हरिद्वार येथे दाखल होणार होती.
#WATCH: Visuals from the train derailment site in Muzaffarnagar's Khatauli; 6 coaches have derailed. More details awaited #UttarPradeshpic.twitter.com/AiNdfKV7oS
— ANI UP (@ANINewsUP) August 19, 2017
Uttar Pradesh: Six coaches of Puri-Haridwar-Kalinga Utkal Express derail in Muzaffarnagar's Khatauli pic.twitter.com/KBxd9NytBf
— ANI UP (@ANINewsUP) August 19, 2017
Uttar Pradesh: Six coaches of Puri-Haridwar-Kalinga Utkal Express derails in Muzaffarnagar's Khatauli, more details awaited. pic.twitter.com/ndOpezFsX6
— ANI (@ANI) August 19, 2017