अस्पृश्यता मानणाऱ्या महिलेची हकालपट्टी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:25 AM2018-07-10T05:25:18+5:302018-07-10T05:25:38+5:30
कथित कनिष्ठ जातीतील विद्यार्थिनीने स्पर्श केलेले अन्नाचे ताट फेकून दिल्याबद्दल कंत्राटावर काम करीत असलेल्या स्वयंपाकी महिलेला सोमवारी सरकारी शाळेतून काढून टाकण्यात आले, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.
उदयपूर (राजस्थान) : कथित कनिष्ठ जातीतील विद्यार्थिनीने स्पर्श केलेले अन्नाचे ताट फेकून दिल्याबद्दल कंत्राटावर काम करीत असलेल्या स्वयंपाकी महिलेला सोमवारी सरकारी शाळेतून काढून टाकण्यात आले, असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.
मेघवाल समाजाची व आठव्या वर्गात शिकणारी मुलगी तिला जातीवरून कशी भेदभावाची वागणूक दिली गेली हे सांगत असलेला व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यावर कारवाई केली गेली. स्वयंपाकी महिलेने मुलीला भेदभावाची वागणूक दिली गेल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली होती. परंतु, स्थानिकांनी तिच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली. त्यामुळे तिला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला.
दोन जुलै रोजी शाळेत बनवण्यात आलेल्या माध्यान्य भोजनाला मुलीने स्पर्श केल्यामुळे ती कनिष्ठ जातीतील असल्याबद्दल स्वयंपाकी कमला वैष्णव हिने तिला नीट वागवले नव्हते. वैष्णव हिने त्या मुलीने अन्नाला केवळ स्पर्श केला म्हणून ते फेकूनही दिले होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे स्थानिकांत संताप निर्माण झाला व त्यामुळे शाळा व्यवस्थापनाला
शालेय व्यवस्थापन समितीची
बैठक बोलावणे भाग पडले. त्या बैठकीत कमला वैष्णव हिला कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला गेला. (वृत्तसंस्था)
वरिष्ठ तक्रारही ऐकेनात
मुलगी म्हणाली की, स्वयंपाकी बाई माझ्याशी वाईट वागली व तू कनिष्ठ जातीची असल्याचे माहीत असूनही अन्नाला स्पर्श का केला, असे मला विचारले. तिने ते अन्न बाहेर फेकून दिल्याचा आरोपही मुलीने केला. ती म्हणाली, या घटनेनंतर माझी मानसिक अवस्था बिघडली व मी शाळा कर्मचाºयांकडे तक्रार केली, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. नंतर ती मुलगी तिच्या आईसोबत शाळेत आली व आईने शाळेच्या प्रभारींकडे विषय नेला, परंतु वैष्णव हिच्यावर काही कारवाई झाली नाही. ही मुलगी व स्वयंपाकी महिला एकाच खेड्यात राहतात.