नवी दिल्ली - एकीकडे काँग्रेस फेसबुकवरभाजपाशी हातमिळवणी केल्याचा आरोप करत आहे. तर दुसरीकडे भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून मोठे आरोप केले आहेत. फेसबुकवर राजकीय पक्षांशी हातमिळवणी केल्याच्या झालेल्या आरोपानंतर प्रसाद यांचे हे पत्र अत्यंत महत्वाचे मानले जात आहे.
झुकरबर्ग यांना लिहिलेल्या पत्रात रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे, "फेसबुक इंडियाची टीम राजकीय विचारधारेच्या आधारावर भेदभाव करते. फेसबुकचे कर्मचारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि वरिष्ठ केंद्रीय मंत्र्यांबद्दल अपशब्द वापरतात." एवढेच नाही, तर फेसबुक इंडियाच्या टीममधील अनेक वरिष्ठ अधिकारी एका विशिष्ट विचारधारेचे समर्थक असल्याची माहितीही आपल्याला मिळाली असल्याचे रवी शंकर प्रसाद यांनी या पत्रात म्हटले आहे.
फेसबुकने निष्पक्ष असायला हवे -या पत्रात प्रसाद यांनी पुढे लिहीले आहे, "2019च्या निवडणुकीपूर्वी फेसबुकच्या इंडिया मॅनेजमेंटने राइट विंगची विचारधारा असलेल्या समर्थकांचे फेसबुक पेज डिलीट केले अथवा त्यांचे रीच कमी केले. फेसबुकने संतुलित तसेच निष्पक्ष असायला हवे. कुठल्याही संस्थेत काम करणाऱ्या व्यक्तींची आवड निवड असू शकते. मात्र, एका संस्थेच्या पब्लिक पॉलिसीवर त्याचा कुठलाही परिणाम व्हायला नको.
यापूर्वीही अनेकदा मेल काला - प्रसादरविशंकर प्रसाद यांनी लिहिले आहे, की 'यासंदर्भात मी अनेकदा फेसबुक मॅनेजमेंटला मेल केला आहे. मात्र, त्याला काहीही उत्तर मिळाले नाही. कोट्यवधी लोकांच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर कुण्या एका व्यक्तीची राजकीय बांधिलकी थोपणे कदापी स्वीकार केले जाणार नाही.'
राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्ला - कँग्रेसने काही आंतरराष्ट्रीय माध्यम समुहांचा हवाला देताना, मंगळवारी फेसबुक आणि भाजपाचे लागेबांधे असल्याचा आरोप केला. तसेच भारतीय लोकशाही आणि सामाजिक सद्भावनेवर करण्यात आलेला हल्ला उघड झाल्याचा दावाही केला होता. माजी काँग्रेसाध्यक्ष राहुल गांधी यांनी अमेरिकेतील वृत्तपत्र, ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मधील एक वृत्त ट्विटरवर शेअर करत सरकारवर निशाणा साधाला. राहुल यांनी दावा केला, की 'आंतरराष्ट्रीय माध्यमाने, भारताची लोकशाही आणि सामाजिक सद्भावनेवर फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने केलेला हल्ला उघड केला आहे.' तसेच कुठल्याही परदेशी कंपनीला देशांतर्गत प्रकरणात ढवळाढवळ करण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. त्यांची तत्काळ चौकशी व्हायला हवी आणि दोशी आढळल्यास त्यांना दंड करायला हवा, असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
IndiaChinaTension : NSA अजीत डोवाल अॅक्शन मोडमध्ये, वरिष्ठ अधिकाऱ्यांची घेतली बैठक
...तर पाकिस्तानातच पकडले गेले असले अजित डोवाल!; तुम्हाला माहीत आहेत का त्यांचे 'हे' भीमप्रताप
चीनसाठी USचा मास्टर प्लॅन; नाटो सारखीच संघटना तयार करणार भारत, जपान, ऑस्ट्रेलिया
लडाखमधील वादाच्या आड देशातील उपासमार लपवतोय चीन, 1962 मध्येही होती अशीच स्थिती
प्रणव मुखर्जी यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंचत्वात विलीन