Fact Check: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीची परीक्षा न देताच झाली IAS म्हणून निवड?

By बाळकृष्ण परब | Published: January 19, 2021 04:33 PM2021-01-19T16:33:54+5:302021-01-19T16:38:41+5:30

OM birla Daughter News : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच आयएएस म्हणून निवड झाल्याचा दावा मेसेजमधून करण्यात आला आहे.

Fact Check: Lok Sabha Speaker Om Birla's daughter was selected as IAS without taking the exam? | Fact Check: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीची परीक्षा न देताच झाली IAS म्हणून निवड?

Fact Check: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीची परीक्षा न देताच झाली IAS म्हणून निवड?

googlenewsNext
ठळक मुद्देयूपीएससीच्या परीक्षेमध्ये ९० जणांना मागच्या दाराने प्रवेश देण्यात आल्याचा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच आयएएस म्हणून निवड झाल्याचाही दावा त्यावरून आता व्हायरल होत असलेल्या या पोस्ट खऱ्या आहेत. की, खोटे आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे

नवी दिल्ली - लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला ही नुकतीच आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिच्याबाबत एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच आयएएस म्हणून निवड झाल्याचा दावा या मेसेजमधून करण्यात आला आहे. यूपीएससीच्या परीक्षेमध्ये ९० जणांना मागच्या दाराने प्रवेश देण्यात आल्याचा दावाही केला जातोय. असे दावे करणाऱ्या अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. सरकार आता गरीब आणि ग्रामीण भागातील मुलांना यूपीएससीमध्ये प्रवेश बंद करण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. त्यावरून आता व्हायरल होत असलेल्या या पोस्ट खऱ्या आहेत. की, खोटे आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे.

दरम्यान, प्रख्यात वृत्तसंस्था असलेल्या एएफपीने व्हायरल होत असलेल्या या मेसेजची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला आहे. एएफपीने सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेची मेरिट लिस्ट शोधली. त्यामध्ये अंजली बिर्ला यांचे नाव आणि परीक्षा क्रमांक दिसून आले. तसेच अंजली बिर्ला यांचे नाव यूपीएससीच्या वेबसाइटवरसुद्धा आहे. त्यामुळे ओम बिर्ला यांच्या कन्येला आयएएसमध्ये मागच्या द्वाराने प्रवेश देण्यात आल्याचा करण्यात आलेला दावा खोटा ठरला आहे.



अंजली बिर्ला यांचे प्राथमिक शिक्षण कोटा येथे झाले. कोटा येथील सोफिया गर्ल्स स्कूलमधून १२वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी दिल्लीती रामजस कॉलेजमधून पदवीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर आयएएसची परीक्षा दिली. या परीक्षेत अभ्यास करून त्यांनी आयएएसची परीक्षा उत्तीर्ण केली.


अंजली बिर्ला यांनी भारतीय प्रशासन सेवेत निवड झाल्यानंतर आता महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. आता प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर महिला सशक्तीकरणाच्या क्षेत्रात काम करण्यास आपले प्राधान्य असेल. असे अंजली बिर्ला यांनी सांगितले. तसेच यादरम्यान, जे काही लक्ष्य दिले जाईल, ते पूर्ण करण्याचा आपला प्रयत्न असेल, असेही त्या म्हणाल्या.

Read in English

Web Title: Fact Check: Lok Sabha Speaker Om Birla's daughter was selected as IAS without taking the exam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.