नवी दिल्ली - लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला ही नुकतीच आयएएसची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून तिच्याबाबत एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच आयएएस म्हणून निवड झाल्याचा दावा या मेसेजमधून करण्यात आला आहे. यूपीएससीच्या परीक्षेमध्ये ९० जणांना मागच्या दाराने प्रवेश देण्यात आल्याचा दावाही केला जातोय. असे दावे करणाऱ्या अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. सरकार आता गरीब आणि ग्रामीण भागातील मुलांना यूपीएससीमध्ये प्रवेश बंद करण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. त्यावरून आता व्हायरल होत असलेल्या या पोस्ट खऱ्या आहेत. की, खोटे आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे.दरम्यान, प्रख्यात वृत्तसंस्था असलेल्या एएफपीने व्हायरल होत असलेल्या या मेसेजची सत्यता पडताळण्याचा प्रयत्न केला आहे. एएफपीने सिव्हिल सर्व्हिसेसच्या मुख्य परीक्षेची मेरिट लिस्ट शोधली. त्यामध्ये अंजली बिर्ला यांचे नाव आणि परीक्षा क्रमांक दिसून आले. तसेच अंजली बिर्ला यांचे नाव यूपीएससीच्या वेबसाइटवरसुद्धा आहे. त्यामुळे ओम बिर्ला यांच्या कन्येला आयएएसमध्ये मागच्या द्वाराने प्रवेश देण्यात आल्याचा करण्यात आलेला दावा खोटा ठरला आहे.
Fact Check: लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या मुलीची परीक्षा न देताच झाली IAS म्हणून निवड?
By बाळकृष्ण परब | Published: January 19, 2021 4:33 PM
OM birla Daughter News : लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच आयएएस म्हणून निवड झाल्याचा दावा मेसेजमधून करण्यात आला आहे.
ठळक मुद्देयूपीएससीच्या परीक्षेमध्ये ९० जणांना मागच्या दाराने प्रवेश देण्यात आल्याचा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी अंजली बिर्ला हिची परीक्षा न देताच आयएएस म्हणून निवड झाल्याचाही दावा त्यावरून आता व्हायरल होत असलेल्या या पोस्ट खऱ्या आहेत. की, खोटे आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झालेला आहे