स्वच्छ राजकारणासाठी फैसल यांचे लोकवर्गणी अभियान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 05:38 AM2019-01-24T05:38:27+5:302019-01-24T05:38:42+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये स्वच्छ राजकारण आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी लोकवर्गणी अभियान सुरू केले आहे.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये स्वच्छ राजकारण आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी माजी आयएएस अधिकारी शाह फैजल यांनी लोकवर्गणी अभियान सुरू केले आहे. परिवर्तनासाठी ही लोकचळवळ आहे. स्वच्छ राजकारण आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी या अभियानाचे भागीदार व्हा व यथाशक्ती देणगी देऊन शाह फैसलला सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी टिष्ट्वटरवरून केले आहे.
देणगी जमा करण्यासाठी त्यांनी बँकेचा खाते क्रमांकही दिला असून, ई-वॉलेटने देणगी देऊ शकता, असे शाह फैसल यांनी सांगितले.
जानेवारीच्या सुरुवातीला सरकारी सेवेचा त्यांनी राजीनामा दिला होता. काश्मीरमधील हिंसाचार, हत्यांचे सत्र, केंद्र सरकारची अनास्था आणि हिंदुत्वावादी शक्तींच्या हस्ते जम्मू-काश्मीरमधील २० कोटी भारतीय मुस्लिम समुदायाला हक्कांपासून वंचित ठेवून दुय्यम दर्जाची वागणूक देणे; जम्मू-काश्मीरच्या अस्मितेवरील हल्ला व अतिराष्टÑवादाच्या नावाखाली फोफावणाऱ्या असहिष्णू द्वेषमूलक संस्कृतीचा निषेध म्हणून मी राजीनामा दिला, असे फैसल यांनी म्हटले होते.