अर्ज केलेल्यांना मिळणार कृृषी पंप
By admin | Published: January 31, 2015 12:34 AM
अर्ज केलेल्यांना मिळणार कृषी पंप बॅकलॉग दूर करण्यासाठी पुढाकार नागपूर : विदर्भातील कृषी पंपांचा बॅकलॉग दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याअंतर्गत महावितरणने त्या प्रत्येक शेतकऱ्याला ३१ मार्चपर्यंत डिमांड नोट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी कृषी पंपासाठी अर्ज केला आहे. मात्र यासाठी अर्जदारांना ३१ मार्चपर्यंत संपर्क साधावा लागणार ...
अर्ज केलेल्यांना मिळणार कृषी पंप बॅकलॉग दूर करण्यासाठी पुढाकार नागपूर : विदर्भातील कृषी पंपांचा बॅकलॉग दूर करण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला असून याअंतर्गत महावितरणने त्या प्रत्येक शेतकऱ्याला ३१ मार्चपर्यंत डिमांड नोट जारी करण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यांनी कृषी पंपासाठी अर्ज केला आहे. मात्र यासाठी अर्जदारांना ३१ मार्चपर्यंत संपर्क साधावा लागणार आहे. विदर्भात कृषी पंपाचा बॅकलॉग मोठ्या प्रमाणावर आहे. जवळपास अडीच लाखापेक्षा अधिक पंपाचा बॅकलॉग आहे. ज्या गतीने बॅकलॉग दूर करण्याचे काम सुरू आहे, त्यानुसार बॅकलॉग दूर करण्यासाठी आणखी शंभर वर्षे लागतील. दरम्यान राज्य सरकारने राज्यात सौर ऊर्जेवर आधारित ५ लाख कृषी पंप लावण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी समिती स्थापन करून पाहणी केली जात आहे. दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी अर्ज करून सुद्धा त्यांना डिमांड नोट (कनेक्शनसाठी देय निधीचे विवरण) मिळालेले नाही. त्यामुळे त्यांचे नाव वेटिंग लिस्टमध्ये आलेले नाहीत. गेल्या वर्षी पैसे भरणाऱ्यांना प्राथमिकतेने कनेक्शन देण्याच्या नियमांचा लाभ सुद्धा त्यांना मिळालेला नाही. अशा परिस्थितीत अर्ज केल्यानंतर सुद्धा डिमांड न मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने डिमांड नोट जारी करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. यासाठी अर्जदारांना १ मार्चच्या पूर्वी महावितरणच्या कार्यालयात कंपनीच्या सील लागलेल्या अर्जाच्या प्रति द्याव्या लागतील. कंपनीने केलेल्या दाव्यानुसार या अर्जदारांना तातडीने कनेक्शन मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. बॉक्स.. ग्राहकांच्या हितासाठी वीज कायदा केंद्र सरकारने २००३ मध्ये वीज कायद्यात संशोधनाची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी देशातील विविध राज्यांच्या सूचना मागविण्यात आल्या आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे की, महाराष्ट्र शासन राज्यातील ग्राहकांचे हित समोर ठेवून केंद्राला शिफारशी करतील.