मुलामुलीचं शिक्षण किंवा लग्नाच्या खर्चासाठी किंवा उपचारासाठी जमीन विकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पण देवीचे भक्त असलेल्या एका कुटुंबाने आपली जमीन विकून त्यातून आलेल्या पैशांमधून भव्य जागरण सोहळा आयोजित केल्याची घटना समोर आली आहे. ते पैसे देवीसाठी समर्पित केले. यावेळी देवीचा जागर करण्यासाठी खास अनुराधा पौडवाल यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. हा सोहळा पाहण्यासाठी लोकांनी खूप गर्दी केली होती.
देवीच्या जागरणासाठी एवढी गर्दी झाली की पुढे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना जास्त फौज मागवावी लागली. शेतकरी असलेल्या चंद्र प्रकाश हे देवीचं खूप मोठे भक्त आहेत. त्यांना जागरण सोहळा आयोजित करायचा होता. यासाठी पैशांची कमतरता होती. पैशांची चणचण असल्याने सोहळा करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे वडिलोपार्जित 120 बिघा जमिनीपैकी 15 बिघा जमीन त्यांना विकली. ही जमीन विकून त्यांना 45 लाख रुपये मिळाले. या पैशांमधून त्यांना कार्यक्रम आयोजित केला. यासाठी खास अनुराधा पौडवाल यांना आमंत्रण देण्यात आलं.
अनुराधा पौडवाल यांनी या कार्यक्रमात भजन गायलं. लोकही मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. शेतकऱ्याची सर्वत्र चर्चा रंगली होती. कारण त्याने जमीन विकून हा कार्यक्रम आयोजित केला होता. हे सगळं देवी मातेच्या आशीर्वादाने मिळालं आहे. त्यामुळे माता देवीसाठी खर्च केलं तर चिंता कसली असंही शेतकरी चंद्रप्रकाश यांनी म्हटलं आहे. अनुराधा पौडवाल यांच्या आगमनामुळे परिसरातील लोकांमध्ये उत्साह वाढल्याचं भाजप नेते ठाकूर अजय प्रताप सिंह यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये हा प्रकार घ़डला आहे. जागरणमध्ये अनुराधा पौडवाल आल्याची माहिती मिळताच एवढा जमाव जमला की कोतवाली पोलिसांना मदत मागावी लागली. फौजफाट्यांच्या उपस्थितीत बुधवारी रात्री शांततेत जागरण पार पडला. आजूबाजूच्या गावातील लोकही इथे जमले होते. चंद्रप्रकाश यांनी आम्ही देवीचे मोठे भक्त असल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.