Farmers Protest : राकेश टिकैत यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती? टिकैत यांनी स्वतःच सांगितलं...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 04:18 PM2021-02-13T16:18:25+5:302021-02-13T16:19:12+5:30

कृषी कायद्यांसंदर्भात समर्थन मिळविण्यासाठी टिकैत महापंचायत करत आहेत. संपत्तीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून टिकैत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (Rakesh Tikait face of kisan andolan gave reply on the question of wealth)

Farmers protest farmer leader Rakesh Tikait face of kisan andolan gave reply on the question of wealth of crores | Farmers Protest : राकेश टिकैत यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती? टिकैत यांनी स्वतःच सांगितलं...!

Farmers Protest : राकेश टिकैत यांच्याकडे कोट्यवधींची संपत्ती? टिकैत यांनी स्वतःच सांगितलं...!

Next

नवी दिल्ली -शेतकरी आंदोलनाचा (Farmers Protest) मुख्य चेहरा आणि भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांच्यावर वरोधकांकडून अनेक प्रकारचे आरोप केले जात आहेत. यातच त्यांच्या संपत्तीसंदर्भातही प्रश्न उपस्थित केले जात आहे. टिकैत यांच्याकडे कोट्वधींची संपत्ती आणि मॉल आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर टिकैत यांनी भाष्य केले आहे. (Farmer leader Rakesh Tikait face of kisan andolan gave reply on the question of wealth of crores)

संपत्तीसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावरून टिकैत यांनी विरोधकांवर निशाणा साधला. एनडीटीव्हीशी बोलताना टिकैत म्हणाले, त्यांनी कमी  आकलन केले आहे. अधिक करायला हवे. आमच्याकडे खूप संपत्ती आहे. किती आहे, हे आम्हालाही माहीत नाही. अनेक हजार करोड असेल. अनेक पटवारी, अधिकारी आणि सरकारं लावावी लागतील तेव्हा मोजली जाईल.

Farmers Protest : "राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते", मुख्यमंत्र्यांनी लगावला सणसणीत टोला

कृषी कायद्यांसंदर्भात समर्थन मिळविण्यासाठी टिकैत महापंचायत करत आहेत. पंचायतीत पूर्वीच्या तुलनेत लोक कमी झाले आहेत, असे विचारले असता, आंदोलन सुरूच राहील. आंदोलन संख्येवर चालत नाही. शेतकरी शेतात कामही करेल आणि आंदोलन तथा पंचायतीतही राहील, असे टिकैत म्हणाले.

शेतकरी नेत्यांत दरीच्या वृत्तांसंदर्भात टिकैत म्हणाले, विरोधकांना काहीच मिळात नाही. त्यामुळे ते 40 शेतकरी नेत्यांत दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. नेत्यांवर संपत्तीचा आरोप लावला जात आहे.

20 फेब्रुवारीला राकेश टिकैत यांची यवतमाळमध्ये सभा -
केंद्र सरकारने लागू केलेले तीनही कृषी कायद्यांविरोधात देशभर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. हे कायदे व्यापारी धार्जिणे असून त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड लूट होणार आहे. दरम्यान हे कायदे परत घ्यावेत अशी मागणी केली जात आहे. याच पार्शवभूमीवर आता राकेश टिकैत 20 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता यवतमाळमध्ये सभेसाठी येणार आहेत.

टिकैत यांचे अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत; नाना पटोले यांची टीका

"राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते" - 
तत्पूर्वी, हरियाणा (Haryana) चे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांना सणसणीत टोला लगावत, "राकेश टिकैत हे फ्रस्ट्रेटेड नेते" असल्याचे म्हटले होते. तसेच शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवायला हवा, असेही ते म्हटले होते.

Web Title: Farmers protest farmer leader Rakesh Tikait face of kisan andolan gave reply on the question of wealth of crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.