फारूख अब्दुल्लांनी केला राष्ट्रगीताचा अपमान? फोनवर बोलण्यात होते व्यस्त..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2016 08:33 AM2016-05-28T08:33:41+5:302016-05-28T08:38:25+5:30
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांच्या शपथविधीस उपस्थित असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांच्यावर राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि.२८ - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा दुस-यांदा सांभाळणा-या ममता बॅनर्जींच्या शपथविधीसाठी उपस्थित असलेले नॅशनल कॉन्फरन्सचे नेते व जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यावर राष्ट्रगीताचा अपमान केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शपथविधीसोहळ्यादरम्यान राष्ट्रगीता सुरू असताना अब्दुल्ला मात्र फोनवर होते, असा आरोप करण्यात येत आहे.
तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी शुक्रवारी दुसऱ्यांदा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. राज्याचे राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांनी रेड रोडवर आयोजित एका समारंभात ६१ वर्षीय ममता बॅनर्जी यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यासाठी नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, राजद प्रमुख लालूप्रसाद यादव आणि द्रमुकच्या कानिमोझी यांच्यासह मोठ्या संख्येत राजकीय नेते उपस्थित होते.
या शपथविधी सोहळ्यात राष्ट्रगीत सुरु असताना, फारुख अब्दुल्ला व्यासपीठावर उपस्थित होते. मात्र, ते फोनवर बोलत असल्याचे कॅमे-यांमध्यै कैद झाले आहे. या मुद्यावरून अब्दुल्ला यांच्यावर जोरदार टीका होत असून त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केल्याचे बोलले जात आहे.
फारूख अब्दुल्ला यांनी मात्र या प्रकरणाबाबत कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला.
I have nothing to tell media: Former J&K CM Farooq Abdullah on disrepect the national anthem issue pic.twitter.com/ycIpc4kPR0
— ANI (@ANI_news) May 27, 2016
#CaughtOnCam Farooq Abdullah talking on phone during the national anthem at Mamata Banerjee's oath taking ceremonyhttps://t.co/3kKSuQUhu5
— ANI (@ANI_news) May 27, 2016