FDI म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया - नरेंद्र मोदी

By admin | Published: September 25, 2014 12:45 PM2014-09-25T12:45:09+5:302014-09-25T16:55:18+5:30

एफडीआय म्हणजे 'फर्स्ट डेव्हलप इंडिया' अशी नवी व्याख्या सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मेक इन इंडिया’ योजनेचे उद्घाटन केले.

FDI is First Development India - Narendra Modi | FDI म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया - नरेंद्र मोदी

FDI म्हणजे फर्स्ट डेव्हलप इंडिया - नरेंद्र मोदी

Next

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. २५ - एफडीआय म्हणजे 'फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट' नव्हे तर 'फर्स्ट डेव्हलप इंडिया'.. प्रत्येक भारतीयाने एफडीआयचा असा अर्थ घेऊन जबबादारी पार पाडावी असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महत्वाकांक्षी ‘मेक इन इंडिया’ या योजनेचे उद्घाटन केले. 
भारताला जागतिक उत्पदान केंद्र बनवणे हा 'मेक इन इंडिया'चा उद्देश असून या योजनेअंतर्गत ३० देशांतील तीन हजार कंपन्यांना भारतात उत्पादनासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. 
अमेरिकेच्या दौ-यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत विज्ञान भवन येथे हा सोहळा पार पडला. यावेळी मुकेश अंबानी, चंदा कोच्चर, अझीम प्रेमजी यांच्यासह उद्योगजगतातील अनेक नामवंत मंडळी उपस्थित होती. एनडीए सरकाराच्या काळात घेतल्या गेलेल्या निर्णयामुळे विश्वासाचे वातावरण तयार झाले असून संपूर्ण जग विशेषत: आशिया खंडाचे भारताकडे लक्ष लागले आहे. 
'काही महिन्यांपूर्वीपर्यंत उद्योगपती भारताबाहेर जात होते, सरकारवर त्यांचा विश्वास नव्हता. ही अतिशय दु:खद बाब असल्याचे सांगत ही परिस्थिती बदलण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मोदी म्हणाले.  देशात कायद्याचे राज्य असणे महत्वाचे आहे मात्र उद्योग जगताचा सरकारवर विश्वास असणेही गरजेचे असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले.  'मेक इन इंडिया' हे सिंहाचे पाऊल असून उद्योगपतींनी देश सोडून जायचा विचार करू नये,  आमच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन त्यांनी केले.तसेच मेक इन इंडियामुळे जगात प्रत्येक गल्लीत वास्को द गामा तयार होईल व भारताच्या शोधात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 
उद्योग जगतासाठी एफडीआय ही एक चांगली संधी आहे. परदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे, मात्र त्यांनी येथील लोकांवर विश्वास ठेवावा. भारताकडे केवळ बाजार म्हणून न बघता येथील ग्राहकांची क्रयशक्ती वाढवण्यासाठीही उद्योगपतींनी प्रयत्न करायला हवा, असेही ते म्हणाले. 
उत्पादन क्षेत्राचा विकास करणे हा 'मेक इन इंडिया'चा उद्देश आहे, मात्र त्याचा फायदा गरीब जनतेलाही मिळाला पाहिजे. फक्त सवलती- सूट देऊन उद्योग वाढत नाही, त्यासाठी पोषक वातावरणही लागते आणि ते निर्माण करणे ही सरकारची जबाबदारी आहे.  देशात केलेली गुंतवणूक सुरक्षित असून आपला निर्णय योग्य आहे असा विश्वास गुंतवणूकदारांना वाटला पाहिजे.  आपले पैसे बुडणार नाहीत हा विश्वास गुंतवणूकदारांना देणे हा आमच्या सरकारचा प्रयत्न आहे, असे मोदी म्हणाले. 
देशात फक्त सरकार असून काम होत नाही, तर त्या सरकारचे अस्तित्व जाणवणे महत्वाचे असते. उद्योगवाढीसाठी कुशल मनुष्यबळाची गरज असते, त्याने देशाच्या विकासास चालना मिळते. या क्षेत्रात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपला प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत मोदींनी व्यक्त केले. कालच्या 'मंगलयानाच्या यशस्वी मोहिमेनंतर कोणीही भारतातील तरूणांच्या बुद्धीमत्तेवर, गुणवत्तेवर शंका घेणार नाही, असेही ते म्हणाले. 
 

Web Title: FDI is First Development India - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.