भूस्खलनातून बनलेल्या तलावामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडल्याने पुराची भीती, आसाम-अरुणाचलमध्ये NDRF ची पथके तैनात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 09:18 PM2018-10-20T21:18:45+5:302018-10-21T01:08:22+5:30

- भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अडून एक तलाव निर्माण झाले आहे. या जलाशयात मोठ्या प्रमाणात जलसाठा होत असल्याने आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे.

Fear of flood due to obstructing Brahmaputra due to artificial lakes, NDRF teams deployed in Assam and Arunachal | भूस्खलनातून बनलेल्या तलावामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडल्याने पुराची भीती, आसाम-अरुणाचलमध्ये NDRF ची पथके तैनात

भूस्खलनातून बनलेल्या तलावामुळे ब्रह्मपुत्रेचे पाणी अडल्याने पुराची भीती, आसाम-अरुणाचलमध्ये NDRF ची पथके तैनात

googlenewsNext

गुवाहाटी - भूस्खलनामुळे तिबेटमध्ये ब्रह्मपुत्र नदीचे पाणी अडून एक तलाव निर्माण झाले आहे. या जलाशयात मोठ्या प्रमाणात जलसाठा होत असल्याने आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये पुराचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या अनेक जिल्ह्यात एनडीआरएफच्या 32 टीम तैनात करण्यात आल्या आहेत.



अचानक येऊ शकणाऱ्या पुराच्या पार्श्वभूमीवर अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या अनेक जिल्ह्यात 32 टीम तैनात करण्यात आल्या आहेत, असे एनडीआरएफने सांगितले आहे. दरम्यान, भूस्खलनामुळे चीनमध्ये अडकलेल्या सुमारे सहा हजार जणांना सुखरूपरीत्या वाचवण्यात आल्याचे चीनमधील एमर्जंन्सी सर्व्हिसेसने सांगितले आहे. तसेच या पुराबाबत चीनकडून भारताला माहिती देण्यात येत आहे. 

Web Title: Fear of flood due to obstructing Brahmaputra due to artificial lakes, NDRF teams deployed in Assam and Arunachal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.