नवी दिल्ली - दिल्लीतील प्रसिद्ध हॉस्पिटल एम्समध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. एम्सच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर ही आग लागल्याची माहिती आहे. अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझविण्याचं काम सुरु आहे.
शॉक सर्किटमुळे एम्स हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची माहिती आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे भाजपाचे नेते अरुण जेटली यांच्यावर याच रुग्णालयात उपचार सुरु आहे.
एम्स रुग्णालयात अनेक बड्या नेत्यांवर उपचार केले जातात त्यासाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. सध्याच्या माहितीनुसार अरुण जेटली ज्या मजल्यावर आहेत तिथे ही आग पोहचली नाही. मात्र आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करत आहेत.