दिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2021 12:16 PM2021-12-05T12:16:51+5:302021-12-05T12:17:05+5:30

परदेशातून आलेल्या आणि एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले होते, त्यात एकाला लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

The first case of omicron found in Delhi, infecting five people across the country | दिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण

दिल्लीत आढळला ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण, महाराष्ट्रासह विविध राज्यात 5 जणांना लागण

Next

नवी दिल्ली: मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या 'ओमायक्रॉन' व्हेरिएंटने जगभर धुमाकुळ घातला आहे. अनेक देशात या व्हेरिएंटचचे रुग्ण आढळत आहेत. भारताची राजधानी दिल्लीतही या ओमायक्रॉनचा रुग्ण सापडला आहे. परदेशातून परतलेल्या आणि LNJP रुग्णालयात दाखल असलेल्या एका कोरोना रुग्णामध्ये याची पुष्टी झाली आहे. 

परदेशातून आला रुग्ण
परदेशातून परतलेल्या 12 लोकांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या सर्वांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आले. त्यापैकी एकाला ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. बाधित तरुण टांझानिया या देशाहून आला होता. या रुग्णासह आता देशभरात ओमायक्रॉनची एकूण पाच प्रकरणे समोर आली आहेत. 

गुजरात आणि महाराष्ट्रात ओमायक्रॉनचे रुग्ण
शनिवारी ओमाक्रॉनची दोन प्रकरणे नोंदवली गेली, गुजरातमधील जामनगरमध्ये 72 वर्षीय ओमाक्रॉन संक्रमित आढळला, तर दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत परतलेल्या एका व्यक्तीला संसर्ग झाल्याचे आढळून आले. दक्षिण आफ्रिकेतून ही व्यक्ती दुबईमार्गे दिल्लीत आली आणि तिथून मुंबईत पोहोचली. 25 नोव्हेंबर रोजी त्याला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आणि आता त्यात ओमायक्रॉन प्रकार आढळून आला आहे. सध्या या व्यक्तीला कल्याण डोंबिवली कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात दोन रुग्ण सापडले
मागच्या आठवड्यातही ओमायक्रॉनची दोन रुग्ण आढळले आहेत. यामध्ये 46 वर्षीय डॉक्टर आणि दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाचा समावेश आहे. बाधित डॉक्टरांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळाले होते. याशिवाय त्यांनी अलीकडे कोणताही प्रवास केला नव्हता. दक्षिण आफ्रिकेचा नागरिक भारतात आला तेव्हा त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता, मात्र नंतर तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याचा नमुना जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवला असता त्यात ओमायक्रॉनची पुष्टी झाली.
 

Web Title: The first case of omicron found in Delhi, infecting five people across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.