संसदेचे पहिले अधिवेशन ६ ते १५ जूनदरम्यान?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:40 AM2019-05-28T04:40:17+5:302019-05-28T04:40:22+5:30

१७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन ६ ते १५ जून या कालावधीत भरण्याची शक्यता आहे.

The first session of the Parliament from June 6 to 15? | संसदेचे पहिले अधिवेशन ६ ते १५ जूनदरम्यान?

संसदेचे पहिले अधिवेशन ६ ते १५ जूनदरम्यान?

Next

नवी दिल्ली : १७ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन ६ ते १५ जून या कालावधीत भरण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी ३१ मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाची पहिली बैठक होईल. त्यामध्ये लोकसभा निवडणुकांनंतरच्या पहिल्या संसदीय अधिवेशनाच्या तारखा ठरविण्यात येतील, असे सूत्रांनी सांगितले.
संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभा, राज्यसभा खासदारांसमोर राष्ट्रपती रामनाथ कोविंद ६ जून रोजी अभिभाषण करतील. त्यानंतर लोकसभेच्या हंगामी अध्यक्षांची त्याच दिवशी निवड करण्यात येईल. लोकसभा निवडणुकांत विजयी ठरलेल्या सर्व खासदारांचा १० जून रोजी शपथविधी होण्याची शक्यता आहे.
लोकसभेच्या अध्यक्षांच्या निवडीनंतर दोन्ही सभागृहांत आभारप्रदर्शनाचा ठराव मांडला जाईल. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील.
पंतप्रधान मोदी व त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा ३० मे रोजी संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी होणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकांत भाजपप्रणित एनडीएने दणदणीत यश मिळवून सलग दुसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करण्याचा मान मिळवला आहे. लोकसभेच्या ५४२ जागांपैकी भाजपने ३०३ जागा व काँग्रेसने ५२ जागा जिंकल्या आहेत.
>मोदी भाजपचे
पहिले नेते
नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाच्या सलग दुसºया कारकिर्दीसाठी निवड झालेले भाजपचे पहिले नेते ठरले आहेत. त्यांच्या पक्षाला सलग दुसºयांदा बहुमत मिळाले आहे. अटलबिहारी वाजपेयी हेही सलग दोनदा पंतप्रधान झाले होते. पण त्यांना पहिल्यांदा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. याआधी जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग यांनी सलग दुसºयांदा पंतप्रधानपद भूषविले होते.

Web Title: The first session of the Parliament from June 6 to 15?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.