हरिश गुप्ता नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष अमित शहा हे राज्यसभेचे सदस्य बनताच खास गुजराती पदार्थ संसदेच्या कँटीनमध्ये हिवाळी अधिवेशनापासून उपलब्ध झाले आहेत. संसदेच्या ७० वर्षांच्या इतिहासात प्रथमच गुजराती पदार्थ सदस्य, कर्मचारी, पत्रकार व पाहुण्यांना दिले जातील.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजराती पदार्थ आवडतात व त्यांनी ते लोकप्रिय बनवण्यासाठी खूप काही प्रयत्न केले आहेत. तरीही संसदेच्या कँटीनने गेल्या ४५ महिन्यांत गुजराती पदार्थ पाहिलेले नाहीत. मोदी संसदेत जेवत नाहीत आणि त्यांना घरी बनवलेले ताजे जेवण आवडते, असे सांगण्यात येते.अमित शहा कँटीनमध्ये जेवायला येतील, असे गृहित धरून सोमवारी गुजराती पदार्थ तयार करण्यात आले होते. काही गुजराती खासदारांनीही संसदेच्या भोजन समितीला आम्हाला गुजराती जेवण मिळावे अशी विनंती केली होती. या समितीचे प्रमुख आहेत तेलंगण राष्ट्र समितीचे नेते जितेंद्र रेड्डी. ही समिती सदस्यांना कोणत्या प्रकारचे भोजन द्यायचे याचे निर्णय घेते. सदस्यांनी केलेली विनंती व त्यांच्या गरजा लक्षात घेऊन भोजनातील पदार्थ तयार केले जातात. मात्र यापूर्वी कधीही कोणत्याही गुजरातमधील जवळपास अर्धा डझन खाद्यपदार्थ कँटीनमध्ये तयार करण्यात आले नव्हते.शहा यांचा संबंध नाही?भाजपच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये गुजराती पदार्थ सुरू करण्यात अमित शहा यांचा काहीही हात नाही.हे सगळे समितीने स्वत:हून ‘प्रायोगिक तत्वावर’ केले आहे.
७0 वर्षांत प्रथमच: संसदेच्या कँटीनमध्ये गुजराती पदार्थ, गुजरातच्या विजयाचा परिणाम?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:44 AM