मालवणच्या समुद्रात मच्छिमाराचे उपोषण
By admin | Published: October 6, 2015 12:42 AM2015-10-06T00:42:00+5:302015-10-06T00:42:00+5:30
पर्ससीनला विरोध : बोटीत बसून आंदोलन
Next
प ्ससीनला विरोध : बोटीत बसून आंदोलनमालवण : सिंधुदुर्ग किनारपीवर धुडगूस घालत असलेल्या परराज्यातील पर्ससीन व हायस्पीड ट्रॉलर्ससह जिल्ह्यातील विनापरवाना मिनिपर्ससीनच्या विरोधात एका युवा मच्छीमाराने सोमवारी मालवण समुद्रात बोटीत बसून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्याच्या या आंदोलनाला स्थानिक मच्छीमारांनी पाठिंबा दिला आहे.छोट्या मच्छीमारांच्या तोंडचा घास हिरावला जात असताना केवळ चार पर्ससीन बोटींवर कारवाई करण्यात आली. परराज्यातील पर्ससीन व हायस्पीड ट्रॉलर्सना प्रशासनाने चाप लावावा, या मागणीसाठी मालवण दांडी येथील मच्छीमार अन्वय प्रभू यांनी सोमवारी समुद्रात सात वाव अंतरात (चार किलोमीटर आतमध्ये) उपोषण सुरू केले. मुख्यमंत्री तसेच मत्स्योद्योगमंत्री यांच्या लेखी आश्वासनानंतरच आंदोलन मागे घेऊ, असे प्रभू यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)