पाच किमी प्रवास फक्त एका रुपयात; मोदीप्रेमी रिक्षावाल्याची खास ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2018 01:26 PM2018-05-29T13:26:07+5:302018-05-29T13:26:07+5:30

मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रवाशांकडून पाच किमी प्रवासासाठी केवळ 1 रुपया भाडे आकारण्याची भन्नाट ऑफर एक मोदी प्रेमी रिक्षावाल्याने दिली आहे.

Five km journey in only one rupee | पाच किमी प्रवास फक्त एका रुपयात; मोदीप्रेमी रिक्षावाल्याची खास ऑफर

पाच किमी प्रवास फक्त एका रुपयात; मोदीप्रेमी रिक्षावाल्याची खास ऑफर

googlenewsNext

उडुपी - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त देशभरात विविधा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याचदरम्यान कर्नाटकमधील कुंदापूर उडुपी येथे राहणाऱ्या सतीश प्रभू यांनी मोदी सरकारचा चौथा वाढदिवस वेगळ्या अंदाजात साजरा केला.  पेशाने रिक्षाचालक असलेल्या सतीश प्रभू यांनी मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त प्रवाशांकडून पाच किमी प्रवासासाठी केवळ 1 रुपया भाडे आकारले. 
मोदींचे चाहते असलेले प्रभू या ऑफरबाबत विचारले असता म्हणाले की, मी गेल्या 25 वर्षांपासून रिक्षा चालवतोय. तसेच मी स्वस्तात प्रवासाची सुविधा दिल्याची ही पहिलीच वेळ नाही.  नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनून एक वर्ष पूर्ण झाले होते तेव्हापासून अशी ऑफर देण्यास मी सुरुवात केली होती. गेल्या तीन वर्षांपासून मी अशी ऑफर देत आहे आणि  मोदींच्या कारकिर्दीस पाच वर्षे पूर्ण होईपर्यंत मी अशी ऑफर देत राहीन." सतीश यांनी मोदींच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले होते तेव्हा  दोन दिवस प्रवाशांना स्वस्तात सेवा दिली होती. पुढे मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाल्यावर तीन दिवस आणि तीन वर्षे पूर्ण झाल्यावर चार दिवस सतीश यांनी एक रुपयात सेवा दिली होती. यावर्षी मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाल्याने पाच दिवस स्वस्तात सेवा देण्याचा त्यांचा मानस आहे. 


सतीश सांगतात, ते मोदींचे मोठे चाहते आहेत.  पण मोदींसाठी फार काही करण्याइतपत आपली योग्यता नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या रिक्षामध्ये एक बॉक्स लावला असून, प्रवाशांना त्या बॉक्समध्ये काही नाणी टाकण्याची विनंती ते करतात. ही एकत्र केलेली नाणी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना भेट देण्याची त्यांची इच्छा आहे. पुढच्या वेळी जेव्हा मोदी उडुपी येथे येतील तेव्हा त्यांना भेटण्यास सतीश प्रभू इच्छुक आहेत.   

Web Title: Five km journey in only one rupee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.