गाझियाबादमध्ये पाच मजली इमारत कोसळली, अनेक जण ढिगा-याखाली अडकल्याची भीती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2018 09:00 PM2018-07-27T21:00:29+5:302018-07-27T21:23:00+5:30
गाझियाबादमध्ये एक पाच मजल्यांची इमारत कोसळली आहे.
उत्तर प्रदेशः मुसळधार पावसानं दिल्ली आणि परिसरातल्या बिल्डिंग कोसळण्याचे प्रकार काही थांबण्याचं नाव घेत नाहीयेत. गाझियाबादमध्ये एक पाच मजल्यांची इमारत कोसळली आहे. कोसळलेल्या इमारतीच्या ढिगा-याखाली अनेक जण गाडले गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिसांची टीम दाखल झाली आहे.
खोडा परिसरातील लोकप्रिय विहार येथे रात्री 8 वाजताच्या दरम्यान ही इमारत कोसळली आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर शोरूम होतं आणि वरच्या मजल्यांवर काही कुटुंब वास्तव्याला होती. परंतु इमारत कोसळली त्यावेळी तिथे कोणी उपस्थित नव्हतं. या इमारतीला हायड्रोलिक क्रेननं अपघातानं धक्का दिला होता. त्यानंतर इमारतीच्या दुरुस्तीचं काम सुरू होतं.
Spot visuals of the five storey building that collapsed in Ghaziabad's Khoda area. No casualty has been reported. NDRF & other rescue teams are present at the spot pic.twitter.com/BnFc6eXj0E
— ANI UP (@ANINewsUP) July 27, 2018
The building was old, nobody stayed there. A clothes showroom was there but that too had been shut down as the condition of the building was not good: Local on 5 storey building that collapsed in Ghaziabad's Khoda area pic.twitter.com/S89pdJmcvm
— ANI UP (@ANINewsUP) July 27, 2018
The building was not in good condition, it was 8-10 years old & had been evacuated already. No casualty has been reported. NDRF & other rescue teams are present at the spot: Ritu Maheshwari, Ghaziabad DM on 5 storey building that collapsed in Ghaziabad's Khoda area pic.twitter.com/gjyJA3kGYk
— ANI UP (@ANINewsUP) July 27, 2018
A five storey building has collapsed in Ghaziabad's Khoda area. More details awaited. pic.twitter.com/kWhI9iGpl9
— ANI UP (@ANINewsUP) July 27, 2018