नवी दिल्ली : पेट्राेल आणि डिझेलच्या उच्चांकी किंमतीमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे माेडले आहे. इंधनाच्या किमती सातत्याने वाढत असल्याने केंद्र सरकार लवकरच प्लेक्स इंजिनावर चालणारी वाहने बनविण्यास सांगणार आहे. तसे झाल्यास पेट्राेल आणि डिझेलवरील अवलंबन कमी हाेऊन ६० ते ६२ रुपये प्रतिलीटर दराने फ्लेक्स (मिश्र) इंधन मिळणार असल्याचे केंद्रीय परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने भारतात पेट्राेल आणि डिझेलचे दर दरराेज वाढत आहेत. त्यातच काेराेना महामारीमुळे सरकारचे उत्पन्नाचे स्त्राेत आटल्याने इंधनावरील करांमध्ये माेठी वाढ करण्यात आली. इंधन दरवाढीमुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. अशा स्थितीत सरकारची कच्च्या तेलावरील अवलंबन कमी करण्याची याेजना आहे. त्यासाठी फ्लेक्स-इंधन इंजिन अनिवार्य होणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. वाहन उद्याेगात १५ वर्षांमध्ये १५ लाख काेटी रुपयांपर्यंत उलाढाल वाढणार आहे. त्यामुळे असे इंजिन अनिवार्य केल्यानंतर किमती वाढणार नाहीत, असा दावाही गडकरी यांनी केला.काय आहे फ्लेक्स?फ्लेक्स इंधन हे पेट्राेल आणि मिथेनाॅल किंवा इथेनाॅल यांच्या संयाेगातून बनविण्यात येते. भारतात पेट्राेलमध्ये ८.५ टक्के इथेनाॅलचे ब्लेंडिंग करण्यात येते. हे प्रमाण दाेन वर्षांमध्ये २० टक्के करण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. या देशांमध्ये वापरब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेत फ्लेक्स इंधनावर चालणाऱ्या इंजिनाची निर्मिती हाेते.
आता वाहनं फ्लेक्स इंधनावर धावणार, खर्च ६० रुपयांवर येणार; गडकरींनी सांगितली आयडियाची कल्पना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 5:53 AM