काँग्रेसचे माजी मंत्री म्हणतात, इंदिरा गांधी, नेहरुंनी देशाची फसवणूक केली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 06:07 PM2018-06-06T18:07:51+5:302018-06-06T18:07:51+5:30

व्हिडीओ क्लिप व्हायरल झाल्यानं काँग्रेस नेता अडचणीत

Former Congress minister says, Indira Gandhi and pandit jawaharlal nehru not contribute independence both cheated country | काँग्रेसचे माजी मंत्री म्हणतात, इंदिरा गांधी, नेहरुंनी देशाची फसवणूक केली

काँग्रेसचे माजी मंत्री म्हणतात, इंदिरा गांधी, नेहरुंनी देशाची फसवणूक केली

googlenewsNext

जोधपूर: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंवर भाजपाकडून केली जाणारी टीका काही नवीन नाही. गेल्याच महिन्यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा नेहरुंवर टीका केली होती. मात्र आता काँग्रेसच्या माजी मंत्र्यानेच नेहरुंवर जोरदार टीका केली आहे. या मंत्र्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये काँग्रेसचा माजी मंत्री इंदिरा गांधींवरही टीका करताना दिसतो आहे. 

राजस्थानचे माजी मंत्री आणि काँग्रेस नेते भरोसीलाल जाटव यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा व्हिडीओ 27 मे रोजी चित्रीत करण्यात आल्याचं सांगितलं जातं आहे. करौलीमध्ये नेहरुंच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात जाटव बोलत होते. नेहरु आणि इंदिरा गांधींनी देशाची फसवणूक केली, असं जाटव या कार्यक्रमात बोलताना म्हणाले. त्यांच्या या विधानाची व्हिडीओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. 

व्हिडीओ क्लिपमुळे अडचणीत सापडलेल्या जाटव यांनी या प्रकरणाचं खापर भाजपावर फोडलं आहे. हा सर्व भाजपाचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'मी 27 मे रोजी नेहरुंच्या पुण्यतिथीनिमित्त भाषण केलं होतं. त्यावेळी मी नेहरु आणि इंदिरा गांधींच्या स्मृतींना उजळा दिला होता. इंदिरा गांधींनी देशासाठी प्राणांचं बलिदान दिलं, असं मी म्हटलं होतं. मी काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता असून माझ्याविरोधात कट कारस्थान रचण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे,' असा आरोप जाटव यांनी केला. जाटव राजस्थानमधील अशोक गेहलोत यांच्या सरकारमध्ये कृषिमंत्री होते. 
 

Web Title: Former Congress minister says, Indira Gandhi and pandit jawaharlal nehru not contribute independence both cheated country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.