कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार काँग्रेस सोडून भाजपमध्ये परतले; सात महिन्यापूर्वीच केला होता प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 01:18 PM2024-01-25T13:18:46+5:302024-01-25T13:21:49+5:30
कर्नाटकात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
देशात काही दिवसातच लोकसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. भाजप आता कर्नाचकात अॅक्शनमोडमध्ये आली आहे, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माजी मुख्यमंत्री शेट्टार भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. शेट्टार हे कर्नाटकातील लिंगायत समाजातील मोठे नेते आहेत. माजी मुख्यमंत्री शेट्टार यांनी १० मे २०२३ च्या विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट न मिळाल्यामुळे भाजप पक्ष सोडला होता आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आता पुन्हा एकदा ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
'गामोछा' माहीत आहे? हे 'अनाप-शनाब' आपल्याला कोण शिकवतं? CM हिमंता राहुल गांधींवर भडकले
आज कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शेट्टार हे लिंगायत समाजाचे नेते आहेत. १० मे २०२३ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट न मिळाल्याने शेट्टार यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा जाहीर केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक लढवली. त्यांनी हुबळी धारवाड सेंट्रल मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना शेट्टार म्हणाले होते की, मला सत्तेची भूक नाही, मला फक्त सन्मान हवा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने मला तिकीट न देऊन माझा अपमान केला आहे, असंही ते म्हणाले होते.
आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी या प्रवेशामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. कर्नाटकातील लिंगायत समाजाचे शेट्टार हे नेतृत्व करतात.
#WATCH | Former Karnataka CM Jagadish Shettar re-joins BJP in the presence of former CM-senior party leader BS Yediyurappa and state BJP President BY Vijayendra, at BJP Headquarters in Delhi.
— ANI (@ANI) January 25, 2024
He had quit BJP and joined Congress in April last year. pic.twitter.com/sVJpP9AVu2