पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड भाजपमध्ये; ५० वर्षांचे जुने संबंध तोडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 06:19 AM2022-05-20T06:19:10+5:302022-05-20T06:19:55+5:30

काही दिवसांपूर्वी सुनील जाखड यांना शिस्तभंगाची नोटीस जारी करून दोन वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले होते. 

former punjab congress state president sunil jakhar joined bjp | पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड भाजपमध्ये; ५० वर्षांचे जुने संबंध तोडले!

पंजाब काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड भाजपमध्ये; ५० वर्षांचे जुने संबंध तोडले!

googlenewsNext

बलवंत तक्षक, लोकमत न्यूज नेटवर्क

चंडीगड :  काँग्रेसशी तीन पिढ्यांपासून असलेले ५० वर्षांचे जुने संबंध तोडून पंजाब प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष सुनील जाखड भाजपमध्ये सामील झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना शिस्तभंगाची नोटीस जारी करून दोन वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले होते. 

त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. त्यांच्या तिसऱ्या पिढीतील त्यांचे पुतणे संदीप जाखड हे काँग्रेसचे आमदार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गुरुवारी दिल्लीत त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी जाखड म्हणाले की, मी राष्ट्रवाद, एकता आणि पंजाबच्या बंधुभावासाठी हे पाऊल उचलले. स्वार्थासाठी  राजकारण केले नाही.  तत्त्वाने नाते सांभाळले; परंतु, पक्षच तत्त्वापासून दूर गेल्यास विचार करावा लागतो.

Web Title: former punjab congress state president sunil jakhar joined bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.