माजी केंद्रीय मंत्री बंडारू दत्तात्रेय यांच्या 21 वर्षांच्या मुलाचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 08:49 AM2018-05-23T08:49:48+5:302018-05-23T08:49:48+5:30
माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार बंडारू दत्तात्रेय यांचा 21 वर्षीय मुलगा वैष्णवचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं.
नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार बंडारू दत्तात्रेय यांचा 21 वर्षीय मुलगा वैष्णवचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. एमबीबीएसच्या तृतीय वर्षाला शिकणा-या बंडारू यांचा मुलगा वैष्णव याच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्यानंतर त्याला सिकंदराबादमधल्या गुरुनानक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
बुधवारी उपचारादरम्यान त्याचं निधन झालं आहे. बंडारू दत्तात्रेय तेलंगणातल्या सिकंदराबादेतून खासदार आहेत. मोदी सरकारमध्ये बंडारू दत्तात्रेय हे 2014पासून 1 सप्टेंबर 2017पर्यंत कामगार मंत्री होते. दक्षिण भारतातल्या राजकारणात बंडारू दत्तात्रेय यांची वेगळी ओळख आहे. बंडारू दत्तात्रेय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये मंत्री होते. मोदी सरकारमध्ये मंत्री असताना त्यांनी कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले.
Former union minister, BJP MP Bandaru Dattatreya’s 21-year-old son Bandaru Vaishnav dies of heart attack. pic.twitter.com/U7a5vuZw0t
— ANI (@ANI) May 23, 2018