स्कल कॅप वापरणाऱ्यास चौघांनी केली बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:14 AM2019-05-28T04:14:32+5:302019-05-28T04:14:40+5:30

पारंपरिक स्कल कॅप घातल्याबद्दल येथे चार जणांनी मोहम्मद बारकर आलम (२५, रा. बिहार) याला मारहाण केली, असे आलम याने रविवारी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले.

Four-wheeler made by a skull cap | स्कल कॅप वापरणाऱ्यास चौघांनी केली बेदम मारहाण

स्कल कॅप वापरणाऱ्यास चौघांनी केली बेदम मारहाण

Next

गुरगाव : पारंपरिक स्कल कॅप घातल्याबद्दल येथे चार जणांनी मोहम्मद बारकर आलम (२५, रा. बिहार) याला मारहाण केली, असे आलम याने रविवारी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले.
आलम येथील जॅकोब पुरा भागात वास्तव्यास आहे. सदर बाजार भागात त्या चार जणांनी मला हटकले व मी स्कल कॅप घातल्याबद्दल आक्षेप घेतला. त्या चौघांनी मला या भागात अशी कॅप घालणे चालणार नाही, असे म्हणून धमकावले. त्यांनी माझी टोपी काढून घेऊन मला झापड मारली. मला ‘भारत माता की जय म्हण’, असे म्हटले, असे आलम याने तक्रारीत म्हटले. ‘त्यांच्या सूचना मी पाळल्या आणि ‘भारत माता की जय’ म्हटले. त्यानंतर त्यांनी ‘जय श्रीराम’ म्हण, असे सांगितल्यावर मी त्याला नकार दिला. त्यामुळे त्या चौघांनी मला रस्त्याच्या कडेला असलेली काठी घेऊन मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
>जरब बसवणारी कारवाई हवी : गंभीर
मोहम्मद आलम याला चार जणांकडून झालेली मारहाण ही खेदजनक असून, पोलिसांनी त्यांना जरब बसेल, अशी कारवाई करावी, असे पूर्व दिल्लीचे भाजपचे खासदार गौतम गंभीर यांनी म्हटले. गंभीर यांनी टिष्ट्वटरवर म्हटले की, भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून, ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांनी ‘लगान’ चित्रपटासाठी ‘ओ पालन हारे’ आणि राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी ‘दिल्ली-६’ या चित्रपटासाठी ‘अर्झियाँ’ लिहिले.

Web Title: Four-wheeler made by a skull cap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.