...तर रस्ते प्रवास होणार फुकटात, टोल न भरता निघा सुस्साट; अट फक्त एकच

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 12:04 PM2021-02-24T12:04:31+5:302021-02-24T12:07:23+5:30

मोदी सरकारकडून नव्या योजनेवर काम सुरू; अंमलबजावणी झाल्यास विनाटोल प्रवास करता येणार

Free Travel On National Highway Toll Plazas If Traffic Jam Hit Line Drawn By Nhai | ...तर रस्ते प्रवास होणार फुकटात, टोल न भरता निघा सुस्साट; अट फक्त एकच

...तर रस्ते प्रवास होणार फुकटात, टोल न भरता निघा सुस्साट; अट फक्त एकच

googlenewsNext

नवी दिल्‍ली: रस्ते आणि वाहूतक कोंडी हे समीकरण नवीन नाही. वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना अनेकदा चालकांना मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच अनेकदा टोलनाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. या रांगा टाळण्यासाठी आता मोदी सरकार नव्या धोरणावर काम करत आहे. या धोरणाची अंमलबजावणी सुरू झाल्यास रस्ते वाहतूक वेगवान होईल.

नवी योजना लागू झाल्यास राष्ट्रीय महामार्गांवर वाहतूक कोंडी झाल्यास टोल भरावा लागणार नाही. टोल नाक्यावरील प्रत्येक लेनमध्ये एक वेगळ्या रंगाची रेष असेल. वाहतूक कोंडी झाल्यास, वाहनांची रांग रेषेच्या पुढे गेल्यास टोल ऑपरेटरला त्या लेनचा गेट उघडावा लागेल. त्यानंतर त्या लेनमधील सर्व वाहनं टोलशिवाय जाऊ शकतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार सध्या या योजनेवर काम करत आहे.

बाप रे...फास्टॅगच्या खात्यावर पैसै असतानाही भरावा लागतोय वाहनधारकांना दंड

वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी फास्टॅग प्रणाली (fastag) आणण्यात आली. आता फास्टॅगचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र तरीही वाहतूक कोंडीची समस्या कायम असल्याचे अहवाल वाहतूक मंत्रालयाला मिळाले आहेत. त्यामुळे मंत्रालयानं सर्व टोल नाके आणि तिथे लागणाऱ्या रांगांचं रियल टाईम मॉनिटरिंग सुरू केलं आहे.

‘फास्टॅग’ असूनही खोळंबा, दुप्पट टोलवसुलीचाही भुर्दंड; रांगाच रांगा लागल्याने वाहनचालक हैराण

गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांची फौज टोल नाक्यावरील वाहतूक व्यवस्थापनाची देखरेख आणि विश्लेषण करत आहे. यामध्ये प्रादेशिक अधिकाऱ्यांपासून मुख्य व्यवस्थापकांपर्यंतच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 'फास्टॅगच्या माध्यमातून होणारे व्यवहार ६०-७० टक्क्यांवरून ९० टक्क्यांपर्यंत गेले आहेत. ग्रामीण भागातही फास्टॅगचा वापर वाढला आहे. त्यामुळे आता आम्ही टोल नाक्यांवर होत असलेल्या कोंडीसाठी कोणतंही कारण देऊ शकत नाही,' अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिली.

टोल नाक्यांपासून किती दूर रेष आखायची याचा निर्णय अद्याप झालेला नाही. टोल नाका ते रेष यांच्यातलं अंतर प्रत्येक ठिकाणी वेगळं असू शकेल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. टोल नाक्यावरील वाहतूक आणि लेन्सची संख्या विचारात घेऊन रेष आखली जाईल, असंदेखील त्यांनी पुढे सांगितलं.

Web Title: Free Travel On National Highway Toll Plazas If Traffic Jam Hit Line Drawn By Nhai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.