Fuel Price Hike: इंधनाची दैनिक दरवाढ सुरूच! मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 31 पैशांनी महागले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 08:27 AM2018-10-09T08:27:55+5:302018-10-09T08:42:09+5:30

Today's Fuel Price Hike: पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे.

Fuel price hike: Petrol, diesel rates hiked yet again in mumbai and delhi | Fuel Price Hike: इंधनाची दैनिक दरवाढ सुरूच! मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 31 पैशांनी महागले

Fuel Price Hike: इंधनाची दैनिक दरवाढ सुरूच! मुंबईत पेट्रोल 23 तर डिझेल 31 पैशांनी महागले

Next

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किमती दररोज वाढत आहेत. सर्वसामान्य जनता यामुळे त्रस्त झाली आहे. दर कपातीनंतर इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. दिल्ली आणि मुंबईमध्येपेट्रोल आणि डिझेल पुन्हा एकदा महागलं आहे. मुंबईत मंगळवारी (9 ऑक्टोबर) पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 31 पैसे प्रति लिटरने महाग झाले आहे. यामुळे मुंबईत आजचा पेट्रोलचा प्रति लिटर दर 87.73 तर डिझेलचा प्रति लिटर दर 77.68 झाला आहे.

(सौजन्यः पेट्रोल-डिझेल प्राइज डॉट कॉम)

राजधानी दिल्लीत पेट्रोल 23 पैसे तर डिझेल 29 पैशांनी प्रति लिटरमागे महाग झाले आहे. यामुळे दिल्लीमध्ये पेट्रोलसाठी एक लिटरमागे 82.26 रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर 74.11 रुपये नागरिकांना मोजावे लागत आहे.


पेट्रोल, डिझेलचे दर नियंत्रणमुक्तच राहणार; महागाईच्या झळा वाढणार

इंधनाचा भडका आणि महागाईचा चटका सहन करणारी देशातील जनता केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर नाराज होती. पेट्रोलने ओलांडलेली नव्वदी आणि डिझेलने पार केलेला 80चा आकडा यामुळे अच्छे दिनच्या स्वप्नाची पार ऐशी तैशी झाल्याची भावना व्यक्त होत होती. विरोधी पक्षही या मुद्द्यावरून सरकारवर टीकेची झोड उठवत होते. या पार्श्वभूमीवर, सणासुदीचे दिवस आणि निवडणुका डोळ्यांपुढे ठेवून केंद्र आणि राज्य सरकारने नागरिकांना दरकपातीची भेट दिली होती. मात्र त्यानंतरही इंधन दरवाढीची मालिका सुरुच आहे. 

Web Title: Fuel price hike: Petrol, diesel rates hiked yet again in mumbai and delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.