गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपींचा छळ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 04:06 AM2018-06-20T04:06:39+5:302018-06-20T04:06:39+5:30
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक केलेल्यांपैकी चार आरोपींचा पोलिसांनी कोठडीत छळ केल्याची तसेच कायदेशीर तरतुदींचे पालन झाले नसल्याची तक्रार कर्नाटक उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
बंगळुरु : पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक केलेल्यांपैकी चार आरोपींचा पोलिसांनी कोठडीत छळ केल्याची तसेच कायदेशीर तरतुदींचे पालन झाले नसल्याची तक्रार कर्नाटक उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणी दोन न्याय दंडाधिकाऱ्यांकडून उच्च न्यायालयाने अहवाल मागवला आहे.
न्या. के. एन. फणिंद्र यांनी सोमवारी या प्रकरणी १0 दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथम व तृतीय वर्ग अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाºयांना दिले आहेत. या प्रकरणातील आरोपी अमोल काळे याच्या वतीने अॅड. एन. पी. अमृतेश यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, पोलिसांनी अमोलला कोठडीत मारहाण केली, थोबाडीत मारले व गालावर ठोसेही लगावले. कोठडीत आरोपींशी कसे वागावे, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आखून दिलेल्या तत्त्वांचे पालन करण्यात आलेले नाही.
अमोल काळे, सुजीतकुमार, अमित डेगवेकर, मनोहर एडवे या चार आरोपींचे वकीलपत्र अॅड. एन. पी. अमृतेश यांनी घेतले आहे. काळेचा छळ पोलिसांनी केल्याची तक्रार १४ जून रोजी केली होती. मात्र अमोलची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश न देता त्याच्या अंगावर कुठेकुठे जखमा झाल्या आहेत, इतकाच तपशील न्यायदंडाधिकाºयांनी नोंदवून घेतला. अन्य तीन आरोपींचा जो छळ झाला त्याबद्दलची तक्रार ३१ मे रोजी न्यायदंडाधिकाºयांकडे करण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
>वैद्यकीय तपासणी करा
ंया चारही आरोपींची वैद्यकीय तपासणी करण्याचा आदेश उच्च न्यायदंडाधिकाºयांना द्यावा अशी विनंती अॅड. अमृतेश यांनी केली.आरोपींना बेकायदेशीरपणे कोठडीत डांबण्यात आले असून, त्यांचा जो छळ होत आहे त्याची चौकशी व्हावी असेही ते म्हणाले. आरोपींची इन कॅमेरा जबानी नोंदविण्यात यावी व तसेच त्यांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची भरपाई दिली जावी अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली.