राजीव गांधींचा 'भारतरत्न' परत घ्या! आपकडून दिल्लीत प्रस्ताव मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2018 09:09 PM2018-12-21T21:09:52+5:302018-12-21T21:12:53+5:30
शीख दंगलीवरून काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे.
नवी दिल्ली : 1984 मध्ये उसळलेल्या शीख दंगलीवरून दिल्ली आणि पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापले असून दिल्ली विधानसभेत आप सरकारने दिवंगत पंतप्रधान राजीव गांधींचा भारतरत्न काढून घेण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे.
शीख दंगलीवरून काँग्रेसचे नेते सज्जन कुमार यांना दोषी ठरविण्यात आले आहे. यामुळे त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला होता. तसेच 31 जानेवारीपर्यंत मुभा देण्याची मागणीही त्यांनी केली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये दंगल उसळली होती. यामध्ये सज्जन कुमार यांचा हात असल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
Jarnail Singh,AAP MLA: Delhi Assembly today declared 1984 anti-Sikh riots as worst genocide in the history of India’s national capital. In a resolution that has been passed today we have demanded from the Centre that Bharat Ratna should be withdrawn from Former PM Rajiv Gandhi. pic.twitter.com/g9uskxBe36
— ANI (@ANI) December 21, 2018
यामुळे दिल्ली विधानसभेमध्ये सत्तेत असणाऱ्या आपने पंजाब, हरियाणा आणि दिल्लीतील येत्या लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन ही खेळी केली आहे. आपने विधानसभेमध्ये राजीव गांधी यांच्यामुळे शीख दंगल उसळली होती. यामुळे ते या दंगलीला जबाबदार होते. यामुळे त्यांना देण्यात आलेला देशाचा सर्वोच्च सन्मान भारतरत्न काढून घेण्यात यावा, असा प्रस्ताव आपने आज मांडला होता. तो बहुमताने मंजूर करण्यात आला.