‘इंदोरी पोहा’सह चार पदार्थांना जीआय टॅग?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:57 AM2019-07-15T04:57:24+5:302019-07-15T04:57:34+5:30
‘इंदोरी पोहा’ आणि माळवा प्रांतातील इतर तीन प्रसिद्ध खाद्य पदार्थांना जिओग्राफीकल इंडिकेशन (जीआय) मिळवण्याचा विचार येथील खाद्य पदार्थ निर्मात्यांच्या संघटनेने केला आहे.
इंदूर (मध्य प्रदेश) : इंदूर शहरातील प्रसिद्ध ‘इंदोरी पोहा’ आणि माळवा प्रांतातील इतर तीन प्रसिद्ध खाद्य पदार्थांना जिओग्राफीकल इंडिकेशन (जीआय) मिळवण्याचा विचार येथील खाद्य पदार्थ निर्मात्यांच्या संघटनेने केला आहे. नाश्त्यासाठी ‘इंदोरी पोहा’ प्रसिद्ध असून, माळवा प्रांतातील ‘दूध से बनी शिकंजी’ (दुधापासून बनवलेले गोड पेय), लौंग सेव (लवंगेचा स्वाद असलेली शेव) आणि ‘खट्टा मीठा नमकीन’ स्थानिक तसेच देशभर रसिक खवय्यांमध्ये लोकप्रिय आहे. इंदूर मिठाई और नमकीन निर्माता-विक्रेता व्यापारी संघाचे सचिव अनुराग बोथरा यांनी आम्ही वरील चार पदार्थांना जीआय टॅग मिळवण्यासाठी अर्ज करण्याचे नियोजन करीत आहोत, असे सांगितले.