राज्यातील ७६ पोलिसांचा गौरव; देशातील ९५४ पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2023 06:03 AM2023-08-15T06:03:01+5:302023-08-15T06:04:54+5:30

तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

glory to 76 policemen in the state honoring 954 police personnel of the country | राज्यातील ७६ पोलिसांचा गौरव; देशातील ९५४ पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान

राज्यातील ७६ पोलिसांचा गौरव; देशातील ९५४ पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान

googlenewsNext

सुनील चावके, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रालयाने सोमवारी ९५४  विविध पोलिस पदकांची घोषणा केली असून, त्यात महाराष्ट्रातील एकूण ७६ पोलिसांचा गौरव केला आहे. यात ३३ पोलिस शौर्यपदक, तीन विशिष्ट सेवा पदक, तर ४० प्रशंसनीय सेवा पदकांचा समावेश आहे. 

३३ पोलिसांना शौर्यपदक 

रोहित फार्णे, बाळासाहेब जाधव, सतीश पाटील, भास्कर कांबळे, कृष्णा काटे, द्रुगसे नरोटे, सुरपत वड्डे, संजय वाचामी, गौतम कांबळे, मोरेश्वर पुरम, मसारू कोरेती, मुकेश उसेंडी, विनोद डोकरमारे, कमलाकर घोडाम, चंद्रकांत उईके, महारू कुळमेथे, पोडा आत्राम, दयाराम वाळवे, प्रवीण झोडे, देवीदास हलामी, दीपक मडावी, रामलाल कोरेती, किरण हिचामी, वारलू आत्राम, माधव टिम्मा, नरेश सिडाम, रोहिदास कुसनाके, मुकिंद राठोड, नितेश दाणे, नागेश पाल, कैलाश कुळमेथे, प्रशांत बिटपल्लीवार अशा ३३ पोलिसांना गौरविण्यात येणार आहे.

तीन अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक 

राज्यातील प्रवीण साळुंके (अतिरिक्त पोलिस महासंचालक), विनय कुमार चौबे (पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड), जयंत नाईकनवरे (विशेष पोलिस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र) यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदकाने गाैरवणार.

प्रवीण पडवळ यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक

राज्यातील ४० पोलिसांचा प्रशंसनीय सेवेसाठी गौरव करण्यात येणार आहे. त्यात मुंबई पोलिस दलातील सहपोलिस आयुक्त (वाहतूक) प्रवीणकुमार पडवळ यांच्यासह विजय पाटील, राजेश वाघ, अरुण सावंत, बाळकृष्ण हनुपडे पाटील, आदिकराव पोळ, माया मोरे, आनंदा वाघ, संजू जॉन, सुभाष दूधगावकर, तन्वीर शेख, मनीषा नलावडे, विकास घोडके, अनिल कटके, व्यंकटेश पलकुर्ती, वलू लाभाडे, अरुणकुमार सपकाळ, संजय जाधव, उमर शेख, रविकांत कदम, प्रदीप तांगडे, द्वारकादास चिखलीकर, चंद्रकांत साळुंके, दिनेश म्हात्रे, मोहम्मद अस्लम शेख, सुनील नावर, संजय माळी, अंबादास हुळगे, श्यामराव गडाख, नागनाथ फुटाणे, विजय अवकीकर, भानुदास पवार, अशोक लांडे, भास्कर कदम, गुरुनाथ गोसावी, जगदीश भुजाडे, विजय बाविस्कर अशा ४० पोलिसांचा समावेश आहे.


 

Web Title: glory to 76 policemen in the state honoring 954 police personnel of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस