अमेरिकेत जायचेय, मग २५० शब्दांचा निबंध लिहा!
By admin | Published: June 26, 2015 11:42 PM2015-06-26T23:42:37+5:302015-06-26T23:42:37+5:30
अमेरिकेतील भारतीय दूतावासात मिनिस्टर (अर्थशास्त्र) म्हणून पदस्थापनेसाठी २५० शब्दांचा निबंध लिहिण्याची अट घालण्यात आली आहे
नवी दिल्ली : अमेरिकेतील भारतीय दूतावासात मिनिस्टर (अर्थशास्त्र) म्हणून पदस्थापनेसाठी २५० शब्दांचा निबंध लिहिण्याची अट घालण्यात आली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागातर्फे (डीओपीटी) नोकरीसाठी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात वॉशिंग्टन डीसी येथे महत्त्वाच्या पदांसाठी दक्षता मंजुरी मिळविलेल्या आणि अन्य निकष पूर्ण केलेल्या ५४ वर्षे वयाखालील सुयोग्य अधिकाऱ्यांकडून अर्ज मागिवताना ही निबंधाची अट घालण्यात आली आहे.
अर्ज करू इच्छिणारे अधिकारी हे केंद्रीय प्रतिनियुक्तीवरून निष्कासित झालेले असू नये आणि त्यांना व्यापार, वाणिज्य, उद्योग, वित्त, विदेशी गुंतवणूक, निर्यात प्रोत्साहन, अंतर्गत विकास सहकार्य आदी क्षेत्रातील कामाचा अनुभव असणे आवश्यक असल्याचे या परिपत्रकात म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)