वॉशिंग्टन : आधीच असंख्य व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सातत्याने भर पडणा-या मेसेजेसमुळे युजर्स हैराण असताना आता आणखी एक नवीन डोकेदुखी समोर आली आहे. ओळखीच्या व्यक्तींची दिवसाची सुरुवात चांगली करण्याच्या उद्देशाने गुड मॉर्निंग मेसेजेस पाठवणा-यांमुळे मेसेजेस वाचणा-यांची सकाळ मात्र बॅड ठरत आहे.
सकाळपासून अनेकांच्या व्हाटसअॅपवर आणि अन्य अॅपवर गुड मॉर्निंगचे मेसेज यायला सुरुवात होते. भारतात हे प्रमाण इतके आहे की, दररोज एक तृतियांश स्मार्टफोनची मेमरी या मेसेजेसमुळे आणि त्यासोबत येणाºया फोटोंमुळे फुल होऊ लागली आहे. वेस्टर्न डिजिटल कॉर्प कंपनीच्या आकडेवारीनुसार, भारतात प्रत्येक तीन स्मार्टफोनपैकी एक स्मार्टफोन दररोज ‘आऊट आॅफ मेमरी’ होतो. हीच संख्या अमेरिकेत दहापैकी एक आहे. म्हणजेच अमेरिकेत गुडमॉर्निंग मेसेजेसच्या भानगडीत कोणी पडत नसावे.
गुगलने आणला उपाय-आता गुगलने यावर उपाय शोधला असून ‘फाइल्स गो’नावाने एक अॅप तयार केले आहे. यामुळे दरदिवशी १ जीबी डेटा डिलिट करता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून आपण आता गुड मॉर्निंगचे मेसेज डिलिट करू शकतात.
२४ तासांत २० अब्ज मेसेजेस-भारतात व्हॉट्सअपचे युजर्स कोट्यवधी आहेत. दर महिन्याला अॅक्टिव्ह असणारे २० कोटी युजर्स आहेत. मात्र, नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस मात्र एकाच दिवसात २० अब्ज एवढे होते.