गुडन्यूज ! देशातील ११,८६,२०३ रुग्ण कोरोनामुक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 05:00 AM2020-08-04T05:00:00+5:302020-08-04T05:00:36+5:30
देशातील योग वर्ग, संस्था आणि व्यायामशाळा (जिम ) ५ आॅगस्टपासून सुरू होत असून, तिथे प्रत्येक व्यक्तीमध्ये ४ मीटरचे अंतर असावे,
नवी दिल्ली : देशामध्ये सोमवारी कोरोनाचे ५२,९७२ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांची एकूण संख्या आता १८ लाखांहून अधिक झाली. दिलासादायक बाब ही की, कोरोनामधून पूर्णपणे बरे झालेल्यांचा आकडा ११ लाख ८६ हजारांवर गेला आहे. सोमवारी देशभरात कोरोनाच्या आजारामुळे ७७१ जण पावले.
जिम, योग संस्थांसाठी नियमावली जाहीर
देशातील योग वर्ग, संस्था आणि व्यायामशाळा (जिम ) ५ आॅगस्टपासून सुरू होत असून, तिथे प्रत्येक व्यक्तीमध्ये ४ मीटरचे अंतर असावे, जाणा?्या प्रत्येकाच्या मोबाइलमध्ये आरोग्यसेतू ?प डाउनलोड असायला हवा, मास्क बंधनकारक असेल आणि व्यायामाच्या साधने व उपकरणांमध्ये ६ फुटांचे अंतर हवे, अशी नियमावली सरकारने जारी केली आहे.
लहान मुले, ६५ वर्षांवरील व्यक्ती, गरोदर स्त्रिया यांना तिथे प्रवेश असणार नाही. कंटेनमेंट झोनमध्ये जिम व योग संस्था बंदच राहतील. स्पा, सोना, स्टीम बाथ, जलतरण तलाव यांच्यावरील बंदी कायमच आहे.