कोरोना लसीच्या आधीच गुड न्यूज! लहान मुलांसाठी पहिली स्वदेशी न्युमोनिया लस लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 08:30 PM2020-12-28T20:30:49+5:302020-12-28T20:40:31+5:30
serum institute pneumonia vaccine : सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या न्यूमोनियावरील स्वदेशी लसीची बाजारपेठेत विक्री करण्यास औषध महानियंत्रकांनी जुलैमध्ये परवानगी दिली होती. या लसीच्या मानवी चाचण्यांचे तीन टप्पे सीरम इन्स्टिट्यूटने भारत तसेच आफ्रिकेतील गाम्बिया या देशात पार पडले होते.
देशात कोरोना लसीची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. त्याआधीच भारतीयांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. लहान मुलांसाठी न्युमोनियावर स्वदेशी लस लाँच झाली आहे. पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने सांगितले की, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एका कार्यक्रमात ही लस लाँच केली.
भारतामध्ये न्यूमोनियामुळे अर्भके मरण पावण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांच्यासाठी सीरमची स्वदेशी लस वरदान ठरणार आहे. फायझर व ग्लॅक्सोस्मिथक्लाइन या विदेशी कंपन्यांनी न्यूमोनियावर बनविलेल्या लसी सध्या बाजारात उपलब्ध असून त्यापेक्षा सीरमच्या लसीची किंमत खूपच कमी आहे.
अदार पुनावाला यांनी ट्विट करून या लसीची माहिती दिली आहे. डॉ. हर्षवर्धन, लहान मुलांना न्युमोनियापासून वाचविण्यासाठी सीरमने बनविलेली पहिली मेड इन इंडिया लस लस निमोसिल लाँच केल्याबद्दल धन्यवाद असे ते म्हणाले.
Hon. @drharshvardhan ji, thank you for launching PNEUMONSIL, manufactured by @SerumInstIndia, the first made-in-India vaccine to prevent the disease of Pneumonia in children. Thank you @MoHFW_INDIA@gatesfoundation@PATHtweets and especially @BillGateshttps://t.co/Tl6c5kDRko
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) December 28, 2020
सीरमने सांगितले की, न्युमोनिया हे कोरोनाच्या गंभीर लक्षणांपैकी एक आहे. यामुळे ही लस लहान मुलांमध्ये न्युमोनिया होण्यापासून वाचविणार आहे. कोरोनासाठी सध्या लस विकसित केली जात आहे, ती मुलांसाठी नाहीय. यामुळे ही न्युमोनिया लस लहान मुलांना गंभीर कोरोना लक्षणांपासून वाचविण्याची शक्यता आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, ही लस देशातील पब्लिक हेल्थकेअरसाठी मोठी उपलब्धी आहे. ही स्वस्त आणि उच्च प्रतीची लस आहे, जी मुलांना न्युमोनियापासून मुक्त करेल.
सीरम इन्स्टिट्यूटने बनविलेल्या न्यूमोनियावरील स्वदेशी लसीची बाजारपेठेत विक्री करण्यास औषध महानियंत्रकांनी जुलैमध्ये परवानगी दिली होती. या लसीच्या मानवी चाचण्यांचे तीन टप्पे सीरम इन्स्टिट्यूटने भारत तसेच आफ्रिकेतील गाम्बिया या देशात पार पडले होते.