नवी दिल्ली : कोरोना व्हायरसला जागतीक महामारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर यूजर्सना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यासाठी केवळ टेलिकॉम कंपन्याच नाही, तर फेसबूक, युट्यूब आणि गूगलनेही पावले उचलायला सुरुवात केली आहे.
फेसबूक, गूगल, ट्रविटर, मायक्रोसॉफ्ट, युट्यूब, लिंक्डइन आणि रिडीट या कंपन्याही या व्हायरसशी संबंधित चुकीची माहिती नष्ट करण्यासाठी एकत्र आल्या आहेत. तर Google ने 'DO THE FIVE. Help stop coronavirus' या उपक्रमाला सुरुवात केली आहे.
असा आहे गूगलचा उपक्रम -
आपण गूगलवर सर्च करण्यासाठी गेलात तर तेथे आपल्याला 'DO THE FIVE. Help stop coronavirus' असे लिहिलेली एक लिंक दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर 5 गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी पाळल्यानंतर तुम्ही व्हायरसपासून सुरक्षित राहू शकता.
सांगितल्या आहेत या पाच गोष्टी -
- थोड्या-थोड्या वेळाने हात धुणे,
- खोकलताना तोंडाला हात लावण्याएवडी कोपरा लावणे.
- नेहमी-नेहमी तोंडाला स्पर्ष न करणे
- इतरांपासून योग्य अंतरावर राहा
- आपल्याला अस्वस्थ वाटत असेल तर घराबाहेर पडू नये
खरे पाहिले, तर गुगलचा हा उपक्रम लोकांसाठी अत्यंत उपयोगी ठरू शकतो. कोरोनामुळे भारतात आतापर्यंत तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतातील रुग्णांची संख्या 169 वर पोहोचला आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा देशात सर्वाधिक असला तरी, संसर्गाचे प्रमाण कमी आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 49 रुग्ण आहेत. मात्र यातले ४० रुग्ण परदेशातून राज्यात आले आहेत. या लोकांच्या संपर्कात आल्याने कोरोनाची बाधा झालेल्यांची संख्या केवळ ९ इतकी आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी यांनी दिली आह.
दिल्लीपासून केरळपर्यंत पसरलेल्या या व्हायरसने पश्चिम बंगालमध्येही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. कोरोना व्हायरसच्या दहशतीमुळे केंद्र शासित प्रदेश असलेल्या लडाखमधील एक भाग पूर्णपणे देखरेखीखाली ठेवण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानंतर कारगिल सांकू आणि जवळपासची सर्व गावे विशेष देखरेखीखाली ठेवण्यात आली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात अनेकांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचे सॅम्पल्सदेखील तपासनीसाठी पाठवण्यात आले आहेत. लडाखमध्ये आतापर्यंत 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.