विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशमध्ये दरमहा एक लाख रुपये पगार असणाºया एका सरकारी अधिका-यावर पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली, तेव्हा त्याच्याकडे सापडली तब्बल ६० कोटी रुपयांची मालमत्ता. त्याच्याकडे मिळालेल्या घबाडात चांदीचे दिवे व भांडी, मौल्यवान ऐवज व काही फ्लॅटस, निवासी भूखंड तसेच शेतजमीन असल्याचे आढळून आले. या अधिका-याला सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे.विशाखापट्टणम शहर विकास प्राधिकरणातीलअधिकारी पसुपर्थी प्रदीप कुमारच्या विरोधात एका प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. त्याचा तपास करण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आंध्र प्रदेश व तेलंगणा या राज्यांमध्ये १२ ठिकाणी धाडी घातल्या. प्रदीप कुमार हा मे १९८४ मध्ये सरकारी सेवेत रुजू झाला होता, तेव्हा त्याचा पगार दरमहा १३०० रुपये होता.प्रदीप कुमार याच्या व त्याच्या कुटुंबीयांच्या मालकीचे पाच निवासी भूखंड, चार फ्लॅटस, कृष्णा, अनंतपूर व कडापा जिल्ह्यांमध्ये मिळून ९.२० एकर शेतजमीन असल्याचे आढळून आले. या मालमत्तेची नोंदणी तो, त्याचे वडील, पत्नी, मुलगा, मेव्हणा, तसेच काका अशा विविध व्यक्तींच्या नावावर होती.त्यशिवाय त्याच्याकडून २.७ किलोग्रॅम सोने, १२.५ किलोग्रॅम चांदी, दोन प्लॅटिनम अंगठ्या, एक कार, एक दुचाकी वाहन, रोख व ठेवी स्वरूपातील ३५ लाख रुपये, तसेच घरगुती वापरात असलेल्या मौल्यवान वस्तू असे घबाड पोलिसांनी हस्तगत केले आहे. (वृत्तसंस्था)सारे काही भ्रष्ट मार्गानेचपसुपर्थी हा कर्नुल जिल्ह्यातील रहिवासी असून, १९९१ साली त्याला नगरनियोजन पर्यवेक्षक या पदावर बढती मिळाली. तो सध्या अतिरिक्त मुख्य नगर नियोजक या पदावर कार्यरत आहे. आंध्र प्रदेश पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयाने सांगितले की, त्याच्या घरातील पाणी पिण्याचे ग्लास, देवघरातील दिवे, की चेन्स हे चांदीचे होते. त्याने बायकोसाठी सोने व हिºयाचे खूप दागिने विकत घेतले होते. पसुपर्थी प्रदीप कुमारकडे वारशाने आलेली मालमत्ताही नव्हती. त्यामुळे त्याने भ्रष्टाचार करूनच इतकी माया गोळा केली हे स्पष्टपणे दिसते.
सरकारी कर्मचा-याकडे ६0 कोटींची मालमत्ता, अनेक घरे, मौल्यवान ऐवज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 1:59 AM