नवी दिल्ली : यापुढे विमानाने देशांतर्गत प्रवास करण्यासाठीही प्रवाशांकडे सरकारचे ओळखपत्र बंधनकारक केले जाणार आहे. देशांतर्गत विमान प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना (ड्राइव्हिंग लायसन्स), पासपोर्ट किंवा पॅन कार्ड क्रमांक यापैकी एका ओळखपत्राचा क्रमांक देणं बंधनकारक असेल. केंद्र सरकार ८ सप्टेंबर रोजी याबाबतचे नियम जाहीर करणार आहे. ओळखपत्र म्हणून मतदार ओळखपत्राच्या क्रमांकाचा समावेश करावा, असा विचार सुरू आहे.सुरक्षेच्या दृष्टीने नो फ्लाय लिस्ट तयार करण्यात येत असून, त्यासाठी अन्य देशांप्रमाणे आपल्याकडेही काही नियम तयार करण्यात येणार आहेत, असे केंद्रीय राज्यमंत्री जयंत सिन्हा म्हणाले. मंगोलिया येथे नुकत्याच पार पडलेल्या ग्लोबल रेग्युलेटर्सच्या बैठकीला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे प्रतिनिधी मंडळ गेले होते. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, असे ते म्हणाले.
विमानाने देशांतर्गत प्रवास करण्यासाठीही सरकारी ओळखपत्र बंधनकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 08, 2017 1:47 AM