नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज बजेट मांडलं. यावेळी त्यांनी येत्या वर्षात 70 लाख नव्या नोक-या निर्माण करण्याचं सरकारचं लक्ष्य असल्याचं म्हटलं आहे. अरुण जेटली यांनी यावेळी महत्वाची घोषणा करत नव्या नोकरदारांच्या पीएफमध्ये सरकार 12 टक्के रक्कम सरकार भरणार असल्याचंही जाहीर केलं आहे. सध्याच्या नोकरदारांसाठी पीएफमध्ये सरकारचा वाटा 8.33 टक्के इतका आहे. महिला कर्मचाऱ्यांना EPF मध्ये 3 वर्षापर्यंत 8 टक्के सरकारचे योगदान असणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं.
सरकारी योजनांचा महत्त्वाचा भाग नोक-या उत्पन्न करणे आहे असं ते बोलले. नोटाबंदीनंतर झालेले नुकसान भरून काढण्यासाठी लघु उद्योजकांना 3 हजार 700 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. तसंच मुद्रा योजनेतून तरुणांना उद्योग उभा करण्यासाठी 3 लाख कोटी रुपये कर्ज देण्यात येणार. टेक्सटाइल सेक्टरसाठी 7150 कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली असून स्टार्टअप फंडसाठी अधिक सुधारणा करणार असल्याचं अरुण जेटली बोलले आहेत.