कृषी कायदे रद्द हणार नाहीत, अमित शाहांनी केले स्पष्ट; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना बुधवारी लेखी प्रस्ताव देणार

By बाळकृष्ण परब | Published: December 8, 2020 11:36 PM2020-12-08T23:36:48+5:302020-12-09T06:38:59+5:30

Farmer Protest : दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठकही कुठल्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे.

The government's refusal to withdraw the Agriculture Act will give the agitating farmers a written proposal on Wednesday | कृषी कायदे रद्द हणार नाहीत, अमित शाहांनी केले स्पष्ट; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना बुधवारी लेखी प्रस्ताव देणार

कृषी कायदे रद्द हणार नाहीत, अमित शाहांनी केले स्पष्ट; आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना बुधवारी लेखी प्रस्ताव देणार

googlenewsNext

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शाहा यांच्यात सुरू असलेली बैठक समाप्त झाली असून, आधीच्या बैठकांप्रमाणेच ही बैठकही कुठल्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना बुधवारी लेखी प्रस्ताव देणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर शेतकरी नेते हनन मुला यांनी सांगितले की, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास नकार दिला आहे. कृषी कायद्यातील सुधारणांबाबत केंद्र सरकार बुधवारी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना लिखित प्रस्ताव देणार आहेत. या प्रस्तावावर शेतकरी विचार करणार आहेत. दरम्यान, बुधवारी केंद्र सरकारसोबत होणारी बैठक होणार नसल्याचेही मुला यांनी सांगितले.



अखिल भारतीय किसान सभेचे महासचिव असलेल्या हनन मुला यांनी सांगितले की, उद्या सिंघू बॉर्डरवर दुपारी १२ वाजता शेतकऱ्यांची बैठक होणार आहे. आता या बैठकीमधून दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पुढील दिशा मिळण्याची शक्यता आहे.



दरम्यान, केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. या बंदला देशातील विविध भागात चांगला प्रतिसाद मिळाला. या शेतकऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या या बंदला विविध राजकीय पक्षांनी पाठिंबा जाहीर केला होता.

Web Title: The government's refusal to withdraw the Agriculture Act will give the agitating farmers a written proposal on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.