सॅरिडॉन, डिकोल्ड, विक्स अॅक्शन-500सह 328 औषधांवर बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 11:28 AM2018-09-13T11:28:21+5:302018-09-13T11:28:45+5:30
केंद्र सरकारडून 328 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. या औषधांची विक्री आता देशात होणार नाही. आजार लवकर बरा व्हावा यासाठी, अशाप्रकराची औषधे अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत आहेत. ही औषधे आरोग्यास हानीकारक असून यावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
नवी दिल्ली : केंद्र सरकारडून 328 फिक्स्ड डोस कॉम्बिनेशन (एफडीसी) औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. या औषधांची विक्री आता देशात होणार नाही. आजार लवकर बरा व्हावा यासाठी, अशाप्रकराची औषधे अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेत आहेत. ही औषधे आरोग्यास हानीकारक असून यावर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, आता केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाच्या औषध नियंत्रक विभागाने या प्रकारच्या 328 औषधांवर बंदी आणली आहे. त्यामुळे या औषधांची निर्मिती करणाऱ्या अनेक मोठ्या कंपन्यांना दणका बसला आहे. सॅरिडॉन, डिकोल्ड, विक्स अॅक्शन-500, कोरेक्स, सुमो, जिरोडॉल, फेंसिडील, जिंटाप यासारथ्या अॅन्टिबायोटिक्स, पेन किलर्सशी संबंधीत औषधांचा यामध्ये समावेश आहे.
याबरोबर, आणखी सहा औषधांची विक्री करण्यासाठी नियम लावले आहेत. ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकली जाणार नाहीत. दरम्यान, एफडीसी औषधांचे प्रमाण बाजारामध्ये सातत्याने वाढते आहे. त्यामुळे या औषधांचे सेवन हे रुग्णांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरत असल्याच्या तक्रारी केंद्र सरकारच्या औषध नियंत्रक विभागाकडे आल्या होत्या. औषध नियंत्रक विभागाकडे आलेल्या या तक्रारींची दखल घेत दोन वर्षांपूर्वी अशा 343 एफडीसी औषधांवर अखेर बंदी जाहीर केली, मात्र या निर्णयाविरोधात औषध कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर चौकशी समिती स्थापन करुन अहवाल सादर करण्यास सांगितले होते. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर सरकारकडून 328 औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, अमेरिका, जपान, फ्रान्स, जर्मनी, ब्रिटनसह अनेक देशात एफडीसी औषधांवर बंदी घालण्यात आली आहे.