कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी द्या, भारताची पाकिस्तानकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 08:02 PM2017-11-23T20:02:53+5:302017-11-23T20:04:41+5:30
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी लवकरच त्यांची आई आणि पत्नी पाकिस्तानात जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकारने सातत्याने केलेला पाठपुरावा आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी पाकिस्तानने दिली आहे. दरम्यान, कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, त्यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, अशी हमी भारताने पाकिस्तानकडे मागितली आहे.
There was a long standing request from mother of Kulbhushan Jadhav to visit Pak and meet her son. Although this request was pending, India has still responded positively to the offer by Pakistan to arrange meeting of Kulbhushan Jadhav with his wife: MEA Spokesperson Raveesh Kumar pic.twitter.com/10XmJNRl9M
— ANI (@ANI) November 23, 2017
याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले की, कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना त्यांची कोणतीही चौकशी करण्यात येऊ नये. तसेच, त्यांना कोणताही त्रास दिला जाऊ नये, अशी हमी देण्याची मागणी पाकिस्तानकडे करण्यात आली आहे. कुलभूषण जाधव यांची त्यांच्या आई आणि पत्नीशी भेट घडवण्याबद्दल भारत सकारात्मक आहे. जाधव यांच्या आईला मुलाची भेट घ्यायची आहे. अनेक महिन्यांपासून त्यांच्याकडून याबद्दलची इच्छा व्यक्त केली जात आहे, असेही ते म्हणाले.
In our response, we have conveyed that the wife of Jadhav would like to travel with her mother-in-law for meeting. Also sought sovereign guarantee from Govt of Pak to ensure safety, security of both. Also, during their stay in Pakistan they should not be questioned, harassed: MEA
— ANI (@ANI) November 23, 2017
भारतातील निवृत्त नौदल अधिकारी असलेल्या 46 वर्षीय जाधव यांना मार्च 2016 मध्ये बलुचिस्तानात अटक केल्याचा दावा पाकिस्तानी सुरक्षा दलांनी केला होता. पाकच्या लष्करी न्यायालयाने त्यांना हेरगिरी आणि घातपाती कारवायांच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली आहे. भारताने दाखल केलेल्या खटल्याप्रकरणी हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला लेखी उत्तर सादर करण्याचे आदेश गतवर्षी 13 डिसेंबर रोजी दिले होते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुनावणी होऊन आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीस स्थगिती देत पाकिस्तानला सणसणीत चपराक लगावली होती.