नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. कुलभूषण जाधव यांची भेट घेण्यासाठी लवकरच त्यांची आई आणि पत्नी पाकिस्तानात जाण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारत सरकारने सातत्याने केलेला पाठपुरावा आणि आंतरराष्ट्रीय दबाव यामुळे कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी पाकिस्तानने दिली आहे. दरम्यान, कुलभूषण जाधव यांच्या आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही, त्यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, अशी हमी भारताने पाकिस्तानकडे मागितली आहे.
कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी द्या, भारताची पाकिस्तानकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 8:02 PM
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या कुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे.
ठळक मुद्देकुलभूषण जाधव यांच्या नातेवाईकांच्या सुरक्षेची हमी द्याभारताने पाकिस्तानकडे केली मागणीकोणताही त्रास दिला जाऊ नये, अशी हमी द्या.