निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या मुद्द्याव, गुजरातकाँग्रेसमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसत आहे. ग्रामीण भागांत काँग्रेस पक्ष आधीपासूनच मजबूत आहे आणि प्रशांत किशोर हे शहरी भागांत फारसे काही करू शकत नाहीत, कारण शहरी भाग हा भाजपचा पारंपरिक गड आहे, असे पक्षाच्या अनेक नेत्यांचे म्हणणे आहे. तसेच, यासंदर्भात कुठल्याही निर्णयावर पोहोचण्यास आणखी विलंब करू नये, याचा पक्षाच्या रणनीतीवर परिणाम होऊ शकतो, असेही पक्षाच्या वरिष्ठांना कळविण्यात आले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रशांत किशोर हे नोव्हेंबर 2022 मध्ये होणाऱ्या गुजरात निवडणुकीऐवजी, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससोबत मोठी संधी शोधत आहेत. यातच गुजरात काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले आहे, की प्रशांत किशोर यांनी पक्षासाठी काम करण्यावरून गुजरात काँग्रेसमध्ये दुमत आहे. काँग्रेसने 2017 मध्ये भाजपला मोठी टक्कर दिली आणि 182 सदस्य असलेल्या या राज्यात दोन अंकी आकडा ओलांडू दिला नाही, असेही ते म्हणाले.
प्रशांत किशोर यांच्यामुळे गुजरातमध्ये फार फरक पडणार नाही -गुजरात काँग्रेसच्या एका नेत्याने म्हटले आहे, की प्रशांत किशोर यांच्यामुळे, फारसा फरक पडणार नाही. ग्रामीण भाग हा काँग्रेसचा गड आहे आणि शहरी भागात भाजपचा पराभव करणे अवघड आहे, हे नेत्यांनाही माहीत आहे. मग किशोर यांना बोर्डावर आणण्यासाठी एवढा पैसा खर्च करण्याची काय गरज? तो प्रचार आणि इतर काही कामांसाठी उमेदवारांना द्यायला हवा. यामुळे पक्षाला अधिक फायदा होईल." याच बरबोर, माध्यमांतील वृत्तांनुसार, प्रशांत किशोर यांनी पक्षासोबत यावे, अेसही गुजरात काँग्रेसमधील काही नेत्यांचे मत आहे.